Saturday, June 6, 2026
Latest NewsPUNE

बारामतीकरांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवून दाखवणार – सुनेत्रा पवार यांची ग्वाही

पुणे : गेल्या 20 वर्षा पासून मी समाजकारणात कार्यरत आहे. हे करताना महिला सक्षमीकरण, आरोग्य, शिक्षण, जलसंधारण, पर्यावरण अशा विविध गोष्टींना न्याय देण्याचं काम मी करत आहे. मी आजपर्यंत ज्या ज्या गोष्टी हातात घेतल्या त्या यशस्वी करून दाखवल्या आहेत. त्यामुळे महायुतीतल्या नेत्यांनी आणि बारामतीकरांनी माझ्यावर लोकसभेची उमेदवारी देऊन जो विश्वास दाखविला आहे; तो नक्कीच मी सार्थ करून दाखवीन, अशी ग्वाही बारामती लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी दिली. बारामतीला देशाच्या विकासासाठी मुख्य प्रवाहात आणण्यास मी आपली पूर्ण ताकद पणाला लावेल, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित  सभेत त्या बोलत होत्या. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार, प्रफुल्ल पटेल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरपीआय (आठवले गट)चे रामदास आठवले, विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, पुणे लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते.

सुनेत्रा पवार म्हणाल्या, आपण सर्वजण देशाच्या विकासासाठी प्रेरित होऊन एकत्र आलो आहोत. गेल्या दहा वर्षापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशांमध्ये अनेक विकास काम केली असून जगाने याची नोंद घेतली आहे. जनतेच्या मनामध्ये त्यांच्याविषयी विश्वास आहे. महिला, युवक व गरीब यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मोदी सतत प्रयत्नशील आहेत.  देशात वेगाने होणारे मोठे रस्ते, वंदे भारत सारखी रेल्वे, मंगलयान, चंद्रयान यांसारख्या अंतराळ मोहिमा ही सारी मोदींची किमया आहे. त्यामुळे जनतेच्या मनात नरेंद्र मोदी आणि मोदीच आहेत.

पुढे बोलताना पवार म्हणाल्या, बारामती लोकसभा मतदारसंघात झालेली विकास कामे ही अजित पवारांनी केलेल्या कामाची पावती आहे. बारामती हे संपूर्ण महाराष्ट्रात एक विकासाचा मॉडेल बनवून राहिलेला आहे.  हे अजित पवारांची दूरदृष्टी व कष्टाचा फळ आहे. विकासासाठी राजकारण न करणारे अजित पवार हे जनतेच्या मनातील नेते आहेत. अजित पवारांचा मोदी सरकार सोबत जाण्याचा निर्णय हा केवळ विकासासाठी घेतलेला आहे. त्यावर बारामतीतील जनता नक्कीच शिक्कामोर्तब करेल,  मागील दहा वर्षात बारामतीत झालेल्या विकास काम ही केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्यामुळे व अजित पवारांच्या नेतृत्वामुळे झालेली आहेत. अन् आगामी काळात देखील  विकासाची झेप घेईल, असा मला विश्वास वाटतो.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading