fbpx
Monday, June 17, 2024
ENTERTAINMENTLatest News

या करणामुळे राजकुमार राव ठरला बॉलीवूडमधील दर्जेदार स्टार 

अशा उद्योगात जिथे अभिनयाने प्रेक्षकांना मोहित कराव लागत आणि अनेकदा ग्लॅमरसाठी कुठेतरी पुढे यावं लागत पण अभिनेता राजकुमार राव याने या दोन्ही गोष्टींचा मेळ साधून प्रेक्षकांचा विश्वास जिंकला आणि एक उत्तम स्टार म्हणून उदयास आला. बॉलीवूडमधील अष्टपैलू अभिनेता म्हणजे काय याचा खरा अर्थ त्याने दाखवून दिला.
 ‘काई पो चे!’ मधील त्याच्या ब्रेकआउट भूमिकेतून ‘शाहिद’, ‘न्यूटन’ आणि ‘ट्रॅप्ड’ सारख्या चित्रपटांमधील त्याच्या पॉवरहाऊस परफॉर्मन्ससाठी राजकुमार रावने सातत्याने असे परफॉर्मन्स दिले आहेत ज्यांचे केवळ समीक्षकांनीच कौतुक केले नाही तर प्रेक्षकांनाही तो भावला आणि म्हणून पॉवरपॅक परफॉर्मर बनला.
 या बद्दल बोलताना राजकुमार म्हणतो “माझ्यासाठी अभिनय हे प्रसिद्धी किंवा पैसा नाही तर पडद्यावर आपल्या अभिनयाची जादू निर्माण करून त्यातून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन कराव त्यातून त्यांना आनंद मिळावा अस मला वाटतं. “
राजकुमार राव यांची अष्टपैलुत्व त्यांची स्क्रिप्टची निवड आणि वैविध्यपूर्ण पात्रांना योग्य न्याय देण्याची त्यांची क्षमता हे त्याच वेगळेपण आहे. हा अभिनेता स्पॉटलाइट किंवा बिग-बजेट ब्लॉकबस्टर्सचा पाठलाग करणारा नसून एक कलाकार म्हणून त्याला आव्हान देणाऱ्या प्रकल्पांवर काम करण्यास प्राधान्य देतो. राष्ट्रीय पुरस्कार जिंकण्यापासून ते आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये प्रशंसा मिळवण्यापर्यंत राव यांनी वेळोवेळी सिद्ध केले आहे की तो केवळ एक स्टार नाही तर खरा कलाकार आहे.
 राजकुमार राव त्याच्या कलाकृतीच्या सीमा पुढे घेऊन जात असताना तो त्याच्या दोन आगामी रिलीजची वाट पाहत आहे – ‘श्रीकांत’ आणि ‘मिस्टर अँड मिसेस माही’, जे 10 मे आणि 31 मे रोजी रिलीज होणार आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading