fbpx
Monday, June 17, 2024
BusinessLatest News

जावा येझदी मोटरसायकलतर्फे नवीन स्टेल्थ ड्युअल-टोन पेराक सादर

पुणे वर्ष २०२४ साठीची महत्त्वाची घोषणा करताना जावा येझदी मोटरसायकलला आता फॉरवर्ड सेट फूट पेग आणि सुधारित मागील मोनोशॉक यांसह काळजीपूर्वक बारकाईने केलेले पितळी काम असलेली पूर्णपणे नवीन स्टिल्थ ड्युअलटोन पेंट स्कीम अशी महत्वपूर्ण जावा पेराक सादर करताना आनंद होत आहेराइडिंगचा अनुभव आणि उत्साही लोकांसाठी उपलब्धता वाढवण्याच्या उद्देशाने कंपनीने आपल्या बॉबर श्रेणीमध्ये आणखी सुधारणा केल्या आहेत. जावा 42 बॉबर आता २.०९ लाख रु. (एक्सशोरूम दिल्लीआणि नवीन अलॉय व्हील व्हेरियंटच्या रोमांचक किंमतीत उपलब्ध आहे.

भारतीय मोटारसायकल बाजारपेठेतील अग्रगण्य नाव जावा येझदी मोटरसायकल्स जावा पेराक आणि जावा 42 बॉबर या त्यांच्या प्रतिष्ठित मॉडेलसह बॉबर विभागाला पुन्हा परिभाषित करत आहेया बाइक्सनी भारतामध्ये केवळ चित्तथरारक बॉबर संस्कृती प्रस्थापित केली असे नाही तर अस्सल स्टाइलिंग आणि स्पोर्टी कामगिरीचे कौतुक असलेल्या उत्साही लोकांमध्ये प्रचंड लोकप्रियता देखील मिळवली आहे.

शैली आणि कामगिरी या दोन्हीला प्राधान्य देणाऱ्या रायडर्सच्या आकांक्षा पुऱ्या करत बॉबर्स त्यांच्या अद्वितीय अपीलसाठी प्रसिद्ध आहेत जावा पेराक आणि जावा 42 बॉबर या विभागामध्ये अतुलनीय अनुभव देतातहेरिटेज कलेक्शनमधील 2024 जावा पेराक प्रीमियम बॉबर विभागामध्ये उत्कृष्ट फिट आणि फिनिशरिफाइंड राइडिंग डायनॅमिक्स आणि पीरियडकरेक्ट स्टाइलिंगसह नवीन मापदंड प्रस्थापित करते.

नवीन जावा पेराक तपशीलाकडे बारकाईने लक्ष देत आकर्षक स्टिल्थ मॅट ब्लॅक/मॅट ग्रे ड्युअलटोन स्कीम सादर करतेयात सुंदर क्राफ्ट केलेले ब्रास टँक बॅजिंग आणि अस्सल ओल्डस्कूल अपीलसाठी इंधन फिलर कॅप आहे. अधिक आरामासाठी क्लासिक शैलीतील क्विल्टेड टॅन सीट हे वैशिष्ट्य आहेफॉरवर्डसेट फूट पेग्सचा 155 मिमी पुढे स्थितएकूण राइडिंग एर्गोनॉमिक्स आणखी उंचावते.

त्याच्या स्टिल्थी एक्सटीरियर बाह्य भागाअंतर्गत जावा पेराक एक शक्तिशाली 334cc लिक्विडकूल्ड इंजिनद्वारे समर्थित आहेसर्वोत्तम अॅक्सीलरेशन आणि ब्रेकिंगसह आनंददायक कामगिरी सुनिश्चित करत ते उत्कंठावर्धक 29.9PS@7500RPM आणि 30Nm@5500RPM तयार करतेअवघड शहरी प्रवासादरम्यान हलके क्लच अॅक्शन करण्यासाठी असिस्ट आणि स्लिप क्लच सह बाईकमध्ये Continental द्वारे ड्युअलचॅनल ABS आणि मोठे ByBre, डिस्क ब्रेक्स (280mm पुढील आणि 240mm मागील) आहेत. शेवटीनवीन सातस्तरीय प्रीलोड ॲडजस्टेबल मोनोशॉक एक छान आणि आरामदायक राइड सुनिश्चित करते.

जावा 42 बॉबर मूनस्टोन व्हाईट व्हेरियंटची किंमत रु2.09 लाख (एक्सशोरूम दिल्लीअसून

दरम्याननिओरेट्रो कलेक्शनमधील जावा 42 बॉबर श्रेणीआता अधिक सुलभ आणि व्यावहारिक बनली आहे.

मिस्टिक कॉपर आणि जॅस्पर रेड ड्युअलटोन व्हेरियंटसह  २०२४ साठी नवीन दोन नवीन ट्रिम असून आता प्रीमियम डायमंडकट अलॉय व्हीलसह उपलब्ध आहेतLED लाइटिंगडिजिटल इन्स्ट्रुमेंटेशनयूएसबी चार्जिंगएक अॅडजस्टेबल सीट आणि एकाधिक सामान पर्याय यासारख्या आधुनिक वैशिष्ट्यांच्या संपूर्ण संचासह 42 बॉबर फॉर्म आणि कार्यामध्ये एक चांगला समतोल राखतो.

या सादरीकरणाबद्दल भाष्य करताना जावा येझदी मोटरसायकलचे मुख्य कार्यकारी अधिकारी  आशिष सिंग जोशी म्हणाले, “जावा पेराक हे आमच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या मॉडेल्सपैकी एक बनलेभारताच्या वाढत्या महत्त्वाकांक्षी बाजारपेठेचे हे द्योतक आहे. 42 बॉबरने आमच्या विभागातील वर्चस्वाला आणखी मजबूत केलेबॉबर मानसिकता ही एक मनात रुजलेली गोष्ट असते. ती तुमच्याकडे असते किंवा नसते. तुमच्याकडे आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्ही त्याची राईडच घ्यावी लागतेजावा पेराकचे नवीन डिझाईन तुम्हाला या अनोख्या बाजूकडे आकर्षित करते!

जावा 350, जया 42, येझ्दी रोडस्टरयेझ्दी स्क्रॅम्बलर आणि येझदी ॲडव्हेंचरचा समावेश असलेल्या विद्यमान लाइनअपला पूरक जावा 42 बॉबरसह जावा पेराक जावा येझ्दी मोटरसायकलसाठी सध्याचा फॅक्टरी कस्टम पोर्टफोलिओ‘ तयार करते. 

जावा पेराक आणि विविध जावा 42 बॉबर प्रकार (एक्सशोरूम दिल्लीयांच्या किंमती खालीलप्रमाणे

जावा पेराक2,13,187 रु.

जावा 42 बॉबर – मूनस्टोन व्हाइट2,09,500 रु

जावा 42 बॉबर – मिस्टिक कॉपर स्पोक व्हील2,12,500 रु.

जावा 42 बॉबर – मिस्टिक कॉपर अलॉय व्हील 2,18,900 रु.

जावा 42 बॉबर – जॅस्पर रेड ड्युअल टोन स्पोक व्हील: 2,15,187 रु.

जावा 42 बॉबर – जॅस्पर रेड ड्युअल टोन अलॉय व्हील: 2,19,950 रु.

जावा 42 बॉबर – ब्लॅक मिरर2,29,500 रु.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading