fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsSports

दुसरी ‘लायन्स् प्रौढ करंडक’ टी-२० क्रिकेट २०२४ स्पर्धा : एलसीपी रहाटणी संघाची विजयाची हॅट्ट्रीक

पुणे : स्पोटर्सफिल्ड मॅनेजमेंट आणि पुणे लायन्स् तर्फे आयोजित लायन शंतनु सिद्धा स्मृतीप्रित्यर्थ दुसर्‍या ‘लायन्स् प्रौढ करंडक’ (४० वर्षावरील गट) टी-२० क्रिकेट स्पर्धेत एलसीपी रहाटणी संघाने सलग तिसर्‍या विजयासह हॅट्ट्रीक नोंदविली. एसएसपीए क्रिकेट क्लब पहिला विजय मिळवत गुणांचे खाते उघडले.

वारजे येथील स्केलअप क्रिकेट अ‍ॅकॅडमी येथील मैदानावर सुरू असलेल्या स्पर्धेत दिग्विजय मोहीते याने नोंदविलेल्या ७१ धावांच्या खेळीमुळे एलसीपी रहाटणी संघाने फोनिक्स् क्लबचा ९६ धावांनी सहज पराभव केला. दिग्विजय मोहीते याच्या नाबाद ७१ धावांच्या जोरावर एलसीपी रहाटणीने २० षटकात १६६ धावांचे लक्ष्य उभे केले. या आव्हानाचा पाठलाग करताना फोनिक्स् क्रिकेट क्लबचा डाव ७० धावांवर गडगडला. सुधीर साठे याने ३ तर, विजय नवले आणि प्रशांत तेलंग यांनी प्र त्ये की दोन गडी बाद करून संघाला सहज विजय मिळवून दिला.

दुसर्‍या सामन्यात शैलेश बुरसे याने टाकलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर एसएसपीए क्रिकेट क्लबने सीए रॉयल्स्चा ४४ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना एसएसपीए क्रिकेट क्लबने १३६ धावा धावफलकावर लावल्या. रघुनाथ शिंगडे (३६ धावा), पराग केळकर (२२ धावा) आणि दिनेश चौधरी (२० धावा) यांनी संघाच्या डावाला आकार दिला. या धावसंख्येचा पाठलाग करताना सीए रॉयल्स्चा डाव ९२ धावांवर आटोपला. शैलेश बुरसे याने १८ धावात ४ गडी टिपले. योगेश माने याने ३ तर, प्रशांत तुपे याने २ गडी बाद करून संघाचा विजय सोपा केला.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
एसएसपीए क्रिकेट क्लबः २० षटकात ८ गडी बाद १३६ धावा (रघुनाथ शिंगडे ३६, पराग केळकर २२, दिनेश चौधरी २०, अमोल चंगेडीया २-१३, संजय पवार २-१८) वि.वि. सीए रॉयल्स्ः १५.२ षटकात १० गडी बाद ९२ धावा (जिग्नेश संघवी १७, सुहास कौलवार नाबाद २०, शैलेश बुरसे ४-१८, योगेश माने ३-१७, प्रशांत तुपे २-२३); सामनावीरः शैलेश बुरसे;

एलसीपी रहाटणीः २० षटकात ७ गडी बाद १६६ धावा (दिग्विजय मोहीते नाबाद ७१ (५६, ६ चौकार, ३ षटकार), महेश दिवटे २१, मितेश पटांगे ३-२४, आतिश पडवळ २-२४) वि.वि. फोनिक्स् क्रिकेट क्लबः १३.५ षटकात १० गडी बाद ७० धावा (केशव डब्ल्यु. १५, सचिन सामल १५, सुधीर साठे ३-२४, विजय नवले २-१३, प्रशांत तेलंग २-२०); सामनावीरः दिग्विजय मोहीते;

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading