चौकाचौकात रांगोळीच्या पायघड्या घालत नववर्षाचे स्वागत
नववर्षानिमित्त राष्ट्रीय कला अकादमीच्यावतीने शोभायात्रा
पुणे : राष्ट्रीय कला अकादमीच्या वतीने गुढीपाडवा आणि नववर्षानिमित्त शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. शहराच्या मध्यवर्ती भागातून ही शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी चौकाचौकात रांगोळ्या काढून नववर्षाचे स्वागत कलाकारांनी केले. ज्येष्ठ कलाकार देखील शोभायात्रेत सहभागी झाले होते.
अकादमीचे संचालक मंदार रांजेकर, अतुल सोनावणे, सुनील सोनटक्के, योगेश गोलांडे, राजू डेंभे, अकादमीच्या संचालिका रोमा लांडे, अमर लांडे, गणेश माने, योगेश जाधव, निलेश टांगळे, अभिजित कुलकर्णी, गणेश ओरसे, अर्जुन बिराजदार, श्रीकांत बिचुकले यावेळी उपस्थित होते.
प्रभू श्रीराम यांची प्रतीकृती असलेला रथ आणि पारंपरिक वेशात भगवे झेंडे हातात घेऊन कलाकार शोभायात्रेत सहभागी झाले. नातू बागेजवळील राष्ट्रीय कला अकादमीपासून शोभायात्रेला सुरुवात झाली. बाजीराव रस्ता-बदामी हौद चौक- शिंदे आळी- सेवा मित्र मंडळ – चिंचेची तालीम आणि पुन्हा अकादमीच्या येथे शोभायात्रेचा समारोप झाला.
