Saturday, June 6, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

“आधी साहेबांना मग मुलीला अन् आता सुनेला निवडून द्या”, बारामतीत अजित पवारांची जोरदार फटकेबाजी

बारामती : बारामती लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे. यातच ज्याठिकाणी पवार आडनाव दिसेल तिथेच मतदान करा, असे म्हणत “आधी साहेबांना मग मुलीला निवडून दिलं आता सुनेला निवडून द्या”, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. बारामती येथे सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी आले असता ते एका कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. 

यावेळी अजित पवार म्हणाले की, आपण तर पहिल्यांपासून पवारांच्या पाठीशी राहिलो आहे. मग आता बारामतीकरांच्या समोर आपण काय करायचं? असा प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशीही आता ज्याठिकाणी पवार आडनाव असेल तिथे मतदान करायचं. त्यामुळे तुम्हाला कुठेही या प्रश्न येणार नाही. तसेच जी परंपरा आपण पाळत आलो आहोत. ती परंपरा खंडीत केली नाही, अशीही भावना निर्माण होणार नाही,  असेही अजित पवारांनी म्हटलं. 

1991 साली खासदारकीला लेकाला निवडून दिलं. त्यानंतर वडिलांना निवडून दिलं. त्यानंतर लेकीला तीन वेळा निवडून दिलं आणि आता सुनेला निवडून द्या. असे आवाहनही अजित पवारांनी बारामतीकरांना केलं. त्यावर लेकही खुश, कन्याही खूश, सुनही खुश आणि तुम्हीपण खुश असे म्हणत अजित पवारांनी जोरदार टोलेबाजी केली. त्यावर उपस्थितांचा एकदाच हश्शा पिकला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading