Lok Sabha Election २०२४ : सांगली, भीवंडीचा तिढा सुटला; महाविकास आघाडीचे जागा वाटप जाहीर
मुंबई : आज अखेर महाविकास आघाडीचा जागावाटप जाहीर झाले असून सांगली, भीवंडीचा तिढा सुटला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना 21 जागांवर, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 10 जागांवर आणि काँग्रेस पक्ष 17 जागांवर निवडणूक लढणार आहे. गुढी पाडाव्याचे औचित्य साधून आज महाविकास आघाडीतील घटक पक्षाने पत्रकार परिषद घेत हे जागा वाटप जाहीर केले. यावेळी शरद पवार (Sharad Pawar), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व नाना पटोले (Nana Patole), जयंत पाटील (Jayant Patil) उपस्थितीत होते.
सांगलीची जागा ठाकरेंकडे
सांगली हा कॉँग्रेसचा पारंपारीक मतदार संघ मात्र, काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांचे नाव लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदार म्हणून जाहीर केले. वास्तविक या जागेवर कॉँग्रेस ने विशाल पाटील यांना उमेदवारी देण्याची तयारी केली होती. मात्र चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्याने महाविकास आघाडीत सांगलीची जागा हा वादाचा मुद्दा बनली होती. अखेर या वादावर आज पडदा पडला. जागा वाटपात सांगलीची जागा ही ठाकरेंच्या शिवसेनेला देण्यात आली आहे.
भीवंडीची जागा राष्ट्रवादीला देण्यात आली आहे. त्यामुळे कॉँग्रेस ने इथलाही दावा सोडला आहे. दरम्यान जागावाटपाची घोषणा झाली तरी सात जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अजूनही ठरलेले नाहीत.
