“तटकरेंना प्रचंड मतांनी खासदार करण्यासाठी झपाटून कामाला लागा”, अदिती तटकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन
रायगड : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या नेत्यांनी प्रचाराला चांगलीच सुरूवात केलीय. यातच रायगड लोकसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारासाठी महायुतीच्या नेत्यांनी चांगलीच कंबर कसली आहे. याठिकाणी मंत्री अदिती तटकरे यांनी मतदारसंघात बैठकांचा सपाटा लावला आहे. तर दुसऱ्या बाजूला अनिकेत तटकरे देखील नेत्यांच्या गाठीभेटी घेतांना दिसत आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज रायगड लोकसभा मतदारसंघात दोपाली शहरातील व्यापारी वर्ग, बाजार पेठ, बार असोसिएशन, तसेच जैन मंदिर, पंचमुखी मारूती मंदिर येथील पदाधिकाऱ्यांच्या, कार्यकर्त्यांच्या अदिती तटकरे यांनी भेट घेत संवाद साधला. यावेळी शहरातील शहरातील सर्व जेष्ठ श्रेष्ठ मंडळी,महिला,तरुण मित्र मंडळ, आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, यावेळी अदिती तटकरे यांनी शहरातील विभागातील संघटनात्मक बाबींचा आढावा कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. संघटना मजबूत करण्यासाठी एकजुटीने कामाला लागावे. महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना प्रचंड मतांनी रायगडचे खासदार म्हणून पुन्हा निवडून आणण्यासाठी सर्वांनी झटून काम करा असे आवाहन केले.
त्याआधी तटकरे यांनी दापोली शहरातील,चिलंगी मोहल्ला ,खोंडा मोहल्ला ,कोंड मोहल्ला, नशीमन कॉलनी मोहल्ला देशमुख येथील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी घेतल्या. यावेळी शहरातील विभागातील संघटनात्मक बाबीं तसेच कार्यकर्त्यां समवेत संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. संघटना बळकट करण्याच्या दृष्टीने भविष्यात कसे काम करायचे याबाबत मार्गदर्शन केले. महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना प्रचंड मतांनी रायगडचे खासदार म्हणून पुन्हा निवडून आणण्यासाठी झटून कामाला लागावे असे आवाहन केले.
