Saturday, June 6, 2026
Latest NewsMAHARASHTRA

‘गुढी पाडवा, मतदान वाढवा’

छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणूकीत लोकांनी अधिक संख़्येने मतदान करावे यासाठी जिल्हा प्रशासन विविध माध्यमातून जनजागृती करीत आहे. त्यासाठी वेगवेगळ्या औचित्यांची उपयुक्तता साधली जात आहे. मराठी नववर्षाचा पहिला दिवस अर्थात चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा या दिवसाचे औचित्य साधून ‘गुढी पाडवा, मतदान वाढवा,’ हा उपक्रम  जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून राबविला जाणार आहे.

येत्या मंगळवार दि.९ रोजी चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवशी ‘गुढीपाडवा’ हा सण आहे. या सणाला मतदार जनजागृतीची जोड देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सर्व अधिकारी व कर्मचारी मतदान जनजागृती – स्वीप चे कार्यक्रम घेण्यात येणार आहे. याच निमित्ताने दि.८ रोजी सकाळी साडेआठ वा. जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याच कार्यक्रमात विविध स्वीप उपक्रमांचा प्रारंभ करण्याट येणार आहे. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, स्वीप नोडल अधिकारी सुदर्शन तुपे हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व प्रमुख अधिकारी- कर्मचारी सहभागी होऊन मतदार जनजागृतीची सुरुवात करतील.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading