Saturday, June 6, 2026
Latest NewsPUNE

यशस्वी संस्थेतर्फे आयोजित चायनीज खाद्यपदार्थ कार्यशाळा संपन्न

पुणे : खाऊ गल्लीपासून ते पंचतारांकित हॉटेलमधील मेनू कार्डमध्ये आपण बऱ्याचदा चायनीज खाद्य पदार्थांची यादी पाहत असतो.अशा विविध चायनीज खाद्य पदार्थ तयार करण्याची कार्यशाळा यशस्वी एकेडमी फॉर स्किल्स संस्थेच्या शिवाजीनगर येथील महाराष्ट्र कौशल्य विकास केंद्र येथे आयोजित करण्यात आलेली चायनीज खाद्य पदार्थ कार्यशाळा संपन्न झाली.

या तीन दिवसीय कार्यशाळेत चायनीज सूप, स्टार्टर, फ्राईड राईस, मोमोज, शेजवान चटणी,मोमो चटणी आदींबाबत प्रात्यक्षिकांसह शिक्षण देण्यात आले.या कार्यशाळेत चायनीज खाद्य पदार्थांच्या पाककृती शिकविण्याबरोबरच व्यावसायिकम्हणून चायनीज खाद्य पदार्थ बनवताना कशा प्रकारची काळजी घ्यायला हवी,

तसेच संवाद कौशल्य, विक्री व विपणन कौशल्य,उद्योजकता विकास आदींबाबतही या कार्यशाळेत सहभागी  झालेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले,

अशी माहिती‘यशस्वी’संस्थेच्या संचालिका स्मिता धुमाळ यांनी दिली. कार्यशाळेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यातआली.या कार्यशाळेसाठी केंद्र प्रमुख गणेश साळवे यांच्या सह शेफ ब्रिजमोहन रावत, शेफ सौकारसिंग राणा, व शेफ आशिष पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading