ट्रान्सरेल लायटनिंग लिमिटेडने सेबीकडे डीआरएचपी दाखल केले
डीआरएचपी लिंक: https://ingaventures.com/docs/offer-docs/Project_%20Ruby-DRHP_(Filing_version).pdf
ट्रान्सरेल लायटनिंग लिमिटेडने बाजार नियंत्रक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी), बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडकडे आपले ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस दाखल केले आहे.
ट्रान्सरेल लायटनिंग लिमिटेड ही भारतातील आघाडीच्या इंजिनीयरिंग, प्रोक्युअरमेंट आणि कन्स्ट्रक्शन कंपन्यांपैकी एक असून कंपनीकडे लॅटिस स्ट्रक्चर्स, कंडक्टर्स आणि मोनोपोल्ससाठी एकात्मिक उत्पादन सुविधा आहेत. जागतिक पातळीवर सर्वसमावेशक सेवासुविधा टर्नकी आधारावर पुरवण्याचा गेल्या चार दशकांचा अनुभव या कंपनीकडे असून पॉवर ट्रान्समिशन व डिस्ट्रिब्युशन क्षेत्रातील ही विश्वसनीय व दीर्घकाळापासून कार्यरत असलेली सहयोगी म्हणून ओळखली जाते.
आयपीओमार्फत प्रत्येकी २ रुपये दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेयर्समार्फत फंड उभारणी करण्याची कंपनीची योजना आहे. एकूण ऑफरमध्ये ४५०० मिलियन रुपयांपर्यंत (४५० कोटी रुपये) नव्याने जारी करण्यात येत असलेले इक्विटी शेयर्स, आजन्म होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेडकडून (समभाग विक्री करू इच्छिणारे प्रमोटर) विक्रीसाठी प्रस्तुत करण्यात येत असलेल्या १,०१,६०,००० पर्यंत इक्विटी शेयर्सचा समावेश आहे.
आयपीओमधून जे भांडवल उभे राहील त्याचा उपयोग २५०० मिलियन रुपयांपर्यंतच्या इन्क्रिमेंटल खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, ९०९.०२ मिलियन रुपयांपर्यंत भांडवली खर्च करण्यासाठी केला जाईल आणि उर्वरित रक्कम सर्वसाधारण कॉर्पोरेट कामांसाठी वापरली जाईल.
क्रिसिलच्या अहवालानुसार, ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त झालेल्या आर्थिक वर्षात आपल्या क्षेत्रातील इतर कंपन्यांमध्ये टीएलएलने ऑपरेशन्समधून मिळणाऱ्या रेव्हेन्यूमध्ये ३५.१% ची सर्वोच्च वृद्धी नोंदवली आहे.
या ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स इंगा व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड, ऍक्सिस कॅपिटल लिमिटेड, एचडीएफसी बँक लिमिटेड आणि आयडीबीआय कॅपिटल मार्केट्स अँड सिक्युरिटीज लिमिटेड हे आहेत.
