Saturday, June 13, 2026
Latest NewsMAHARASHTRA

साने गुरूजींच्या पुस्तकांचे इतर भाषांमध्ये अनुवाद व्हावा : सुधा साने

सानेगुरूजी साहित्य नगरी,अमळनेर :  श्यामची आई यापुस्तकाचे 13 भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. तसेच जपानी, चीनी व इंग्रजीत अनुवाद करण्यात आला आहे. त्यांच्या काही महत्त्वाचे पुस्तकांचे अनुवाद झाले पाहिजे झाले. याकरीता प्रकाशकांनी पुढे आले पाहिजे, अशी अपेक्षा साने गुरूजी यांच्या पुतणी सुधा साने व्यक्त केली. साने गुरूजींचे 125 जन्म वर्ष आहे. त्यांच्या साहित्यांची खुप गरज आहे. येणाऱ्या काळात महामंडळाने यासंदर्भात उपक्रम हाती घेण्याची गरज आहे. गुरूजींच्या मृत्यूला 75 वर्ष पूर्ण होत आली आहेत, परंतु, आजही खान्देशाच्या मातीत त्यांचा प्रेमाचा दरवळ असल्याचे त्या म्हणाल्या.

 

साने गुरूजी यांच्या पुतणी सुधा साने यांचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार लोकसभा माजी सभापती सुमित्रा महाजन यांच्या हस्ते करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना सुधा साने यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, 1923 सालच्या जुलै महिन्यात गुरूजींनी अमळनेरच्या मातीत पहिले पाऊल टाकले. खान्देशाच्या मातीत एकरूप झाले. कामगारांना न्याय मिळावा म्हणून लढे उभारले. त्यांनी 50 वर्षांच्या आयुष्यातील साडे आठ वर्ष तुरूगांत काढले. साहित्याचे विविध प्रकार हाताळले. 1924 साली त्यांनी प्रथम पुस्तक लिहिले. 100 हून अधिक पुस्तके त्यांनी लिहिली. त्यांच्या कर्मभूमीत 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे याचा मला विशेष आनंद होत आहे. त्यांच्या कामांची दखल घेतली त्यांचा गौरव समजते असेही त्या म्हणाल्या.

 

अलक्षित साने गुरूजी परिसंवादातून उलगडले विविध पैलू

अलक्षित साने गुरूजी या परिसंवदात पूज्य साने गुरुजी यांच्या व्यक्तीमत्त्वातील विविध पैलूंचा समग्र विचारमंथन करण्यात आले. यात प्रामुख्याने साने गुरूजी यांनी नेहमीच मातृहृदयी लेखक म्हणून ओळखले जाते परंतु, त्यांची ओळख तेवढीच नव्हती ते समाज सुधारक, कामगार नेते, विचारवंत, स्त्री आणि दलितांसाठी चळवळ उभारणारे नेते म्हणून पाहिले गेले पाहिजे, अशी अपेक्षा या परिसंवादातून व्यक्त करण्यात आली.

डॉ. मंजूषा कुलकर्णी यांनी साने गुरूजी यांच्याकडे साधन नसताना देखील वेगवेगळे कार्य सिघ्दीस नेले असल्याचे सांगितले. गुरूजी हे वेद व वेदाचे ज्ञाता होते. मरणोप्रांत जीवनाचे उत्तम उदाहरण हे साने गुरूजी होते असे त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. ललित अधाने म्हणाले की, साने गुरुजी यांना असामन्य व्यक्तीमत्त्व लाभले होते. ते सर्व पिढीचे आवडते लेखक आहेत. भालचंद्र नेमाडे यांनी गुरूजींना संत परंपरेतील साहित्य म्हणून गौरवीले असल्याचे स्पष्ट केले आहे. गुरूजींने जे अनुभवले तेच लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रा. लक्ष्मण गंगाधर सोनवणे म्हणाले की, साने गुरूजी यांचे जीवन एक कोडे बनले आहे. गुरूजी लेखक, विचावंत, स्वातंत्र्यवीर, कामगार नेते अशा विविध भूमिका साकरल्या आहेत. येववडा कारागृहात असताना त्यांची आर्चाय विनोबा भावे यांची भेट झाली होती. यातून त्यांना सामाजिक कार्यांची प्रेरणा मिळाली.  त्यांनी हिंदू मुस्लिम एकतेसाठी 1937 साली सोन्या मारोती नावाची कांदबरी लिहली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. परमानंद बावनकुळे म्हणाले की, साने गुरूजी यांनी शिक्षणी पेशाचा राजीनामा देऊन स्वातत्र्य संग्रमात उडी घेतली होती. त्यांचे कार्य दुर्लक्षित राहिले आहे. यात ते लेखक, संत, स्वातंत्र्य सेना म्हणून कार्य केले. परंतू, त्यांच्यातील लेखकाने संत, स्वातत्र्य सेनानी हे पैलू दुर्लक्षित राहिले आहेत. त्यांनी सामाजिक कार्य करतांना दुसऱ्यांचे आंधानुकरण केले नाही. जगातील चांगले साहित्य मराठी अनुवादीत करण्याची संकल्पना त्यांनी मांडली आहे. त्यांनी बहुजन, पिडीत वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी उपोषण देखील केले होते. त्यांनी निर्भिडपणे नेतृत्व केले.

प्रकाश पाठक यांनी गुरूजींनी मातृधर्माला कुटूंब धर्माची जोड दिली. वसुंधरा कुटूंब कल्यमनुसार त्यांनी संपूर्ण जगावर प्रेम केले. सामाजिक जीवन ममत्त्वने जोडले पाहिजे. त्यांनी त्यांचे जीवन समता स्वातंत्र्य बंधूता यांनी जोडले आहे. हे राष्ट्र मोठे झाले पाहिजे. ते समतेचे पुरस्कर्ते होते त्यांचा हा गुण दुर्लक्षीत झाला आहे.

अध्यक्ष चैत्रा रेडकर यांनी साने गुरूजी यांच्या श्यामची आई सोबत त्यांच्या सोन्या मारोती, संध्या, सुधास पत्र यांचे देखली वाचन केले गेले पाहिजे असे अपेक्षा व्यक्त केली. गुरूजी निर्भय व करारी होते. त्यांनी कागमारांचे आंदोलन केले.  आता पेटवू सारे रान असे म्हणत शेतकऱ्यांसाठी लढा उभारला. जगण्यात करुणा नसेल तर धर्म अभिव्यक्तीसाठी मानावे का असा प्रश्न उपस्थित केला होता.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading