Monday, June 15, 2026
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

छत्रपती शिवाजी महाराजांशी मोदींची तुलना करणारे लोक निर्बुद्ध – उद्धव ठाकरे

रायगड : मणीपुरमध्ये महिलांची धिंड काढली जाते. तेथ पंतप्रधान जात नाहीत. बिलक्सि बानो प्रकरणातील आरोपींना क्लीन चिट मिळते, त्यांनाही भेटायला पंतप्रधान जात नाही, तेव्हा अशा व्यक्तीची आपल्या शिवाजी महाराजांशी तुलना करणे योग्य आहे का?, असा प्रश्न विचारात छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी करणारे लोक हे निर्बुद्ध आणि बावळट आहेत, असे टीका शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गोविंद देव गिरी महाराज यांच्यावर आज केली.

आयोध्येतील राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमा दरम्यान गोविंद देव गिरी महाराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना शिवाजी महाराज यांच्या सोबत केली होती. यावर भाष्य करत आज उद्धव ठाकरे यांनी गोविंद देव गिरी महाराज यांच्यावर अतिशय कडक शब्दांत टीका केली आहे.

गोविंद देव गिरी महाराज यांचे नाव न घेता उद्धव ठाकरे म्हणाले, शिवाजी महाराजांची तुलना मोदी शी करणारे हे मोदींचे भक्त असतील. आम्हाला त्यात पडायचे नाही. पण त्यासाठी मोदींची तुलना आमचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणे योग्य नाही, ही लोक निर्बुद्ध आणि बावळट आहेत.

अर्थसंकल्प हा टोपी घालायचा प्रकार

आज निर्मला सितारामण यांनी मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प मांडला. तेव्हा त्यांनी तरुण, गरीब, महिला, शेतकरी यांचा विकास करणार असे सांगतात मग मणीपुरला मोदी का जात नाही. आज पर्यंत मोदी सरकारने 10 अर्थसंकल्प मांडले पण त्यांची किती पूर्तता झाली? दिल्लीत सध्या जादूचे प्रयोग सुरू आहेत. अर्थ संकल्प हा तर टोपी घालायचा प्रकार आहे.  निवडणुकीच्या आधी हे तुम्हाला मेरे देशवासीयो.. आणि नंतर लक्ष ही देणार नाही.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading