अॅडव्हान्टेज विदर्भने केली “खासदार इंडस्ट्रियल महोत्सव – नागपूर”च्या पहिल्या पर्वाची यशस्वी सांगता
“खासदार इंडस्ट्रियल महोत्सव – अॅडव्हान्टेज विदर्भ’ हा नागपूर येथे २७ जानेवारी ते २९ जानेवारी २०२४ दरम्यान भरलेला एक तीन दिवसीय सोहळा होता. विदर्भ आणि महाराष्ट्र प्रांतामध्ये औद्योगिक विकासाला प्रोत्साहन देणे विदर्भातील उद्योगांना आपल्या व्यवसायाच्या क्षमता प्रदर्शित करण्यासाठी एक एकत्रिकृत मंच निर्माण करणे आणि विस्तार तसेच सहयोगासाठी संधींचा शोध घेणे यांवर या कार्यक्रमामध्ये लक्ष्य केंद्रित करण्यात आले. २५० हून अधिक प्रदर्शकांनी या एक्स्पोमध्ये भाग घेतला, ज्यापैकी ९० टक्के प्रदर्शक विदर्भातील औद्योगिक क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करणारे होते.
या प्रसंगी बोलताना असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट (AID) चे अक्ष्यक्ष आशिष हर्षराज काळे म्हणाले, “सरकारचे ज्येष्ठ प्रतिनिधी आणि उद्योगक्षेत्रातील बड्या आसामी यांचे आदरातिथ्य करणे ही AID मध्ये आम्हा सर्वांसाठीच एक आनंददायी बाब होती. त्यांनी या क्षेत्रासाठी पाहिलेल्या स्वप्नासाठी या प्रसंगाच्या निमित्ताने मी या साऱ्याप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करतो. देशाच्या प्रगतीला चालना देण्याच्या कामी आपले भक्कम व सातत्यपूर्ण योगदान देण्याची प्रचंड क्षमता या प्रांताकडे आहे.”
हे तीन दिवसीय एक्स्पो प्रचंड यशस्वी ठरले व त्यात उद्योगक्षेत्रातील धडाडीच्या व्यक्तिमत्वांच्या उपस्थितीत अनेक चर्चासत्रे आयोजित करण्यात आली. भारत एक विकसित देश आहे हे लक्षात घेता स्टार्टअप्सनी येथे दिलेले योगदान अतुलनीय आहे. या पार्श्वभूमीवर या प्रांतामधून स्टार्टअप्सचा एक मोठा समूह उदयास येत असल्याचे पाहताना आम्हाला आनंद होत आहे. या उपक्रमाला उद्योगक्षेत्राने पुरविलेले पाठबळ आणि दिलेले मार्गदर्शन हा या वाटचालीतील महत्त्वपूर्ण टप्पा असणार आहे.
आमचे माननीय केंद्रीय मंत्री नीतिन गडकरीजी देशाच्या विकासगाथेचे अग्रदूत राहिले आहे आणि त्यांनी पाहिलेल्या स्वप्नामधूनच हे लक्षणीय एक्स्पो वास्तवात उतरले आहे. या एक्स्पोमध्ये या प्रांतातील वेगवेगळ्या ४३ व्यवसाय क्षेत्रांच्या २५० हून अधिक प्रदर्शकांचा सहभाग पहायला मिळाला आहे. ”
ते पुढे म्हणाले, “ही तर फक्त सुरुवात आहे आणि आम्हाला अजूनही बरीच मजल गाठायची आहे. एक उद्योगक्षेत्र म्हणून आमच्या नेतृत्वाच्या दूरदृष्टीशी आम्ही कटिबद्ध आहोत.”
आपली जैवविविधता आणि संसाधने यांच्यासाठी ओळखला जाणारा महाराष्ट्रातील विदर्भ प्रांत औद्योगिक आणि पर्यटन क्षेत्रातील गुंतवणूकीचे आशादायी केंद्र म्हणून उदयास येत आहे. नागपूर आणि गडचिरोलीसह ११ जिल्हे असलेला हा प्रांत उत्कृष्ट पायाभूत सोयीसुविधा आणि खनिज पदार्थांच्या मोठ्या वाट्यासाठी प्रसिद्ध आहे. ‘अॅडव्हान्टेड विदर्भ – खासदार औद्योगिक महोत्सव’ हा सोहळ्यामध्ये एंजल इन्व्हेस्टर्स आणि स्थानिक स्टार्टअप्समध्ये झालेल्या २५ हून अधिक सामंजस्य करारांच्या माध्यमातून या दिशेने एक लक्षणीय पाऊल उचलले गेले. हल्दीराम आणि नुवाल्स सारख्या प्रमुख गुंतवणूकदारांनी केवळ वित्तीय पाठबळच नव्हे तर मार्गदर्शनही पुरविण्याचे वचन दिले आहे. हा उपक्रम महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे, भारतीय स्टार्टअप्सच्या क्षेत्रामध्ये २० टक्के तर येथील युनिकॉर्न कंपन्यांमध्ये २५ टक्के योगदान देणाऱ्या या प्रांतातील स्टार्टअप क्षेत्राची होणारी भरभराट आता महानगरांच्या पलीकडे पोहोचली आहे व द्वितीय तसेच तृतीय श्रेणी शहरांतही या घडामोडींना वेग आला आहे. अॅडव्हान्टेज विदर्भ या प्रांतातील युवा प्रतिभेची आणि स्टार्टअप्सची जोपासना करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावण्यास सज्ज आहे.
या तीन दिवसीय कार्यक्रमामध्ये शिक्षण, संरक्षण, हवाई उड्डाण, स्टार्टअप्स, एमएसएमई, बांबू, आयटी आणि आयटीईएस, औषधनिर्मिती, बांधकाम, स्टील आणि पीईबी, लॉजिस्टिक्स आणि गोदाम सुविधा, खनिकर्म उपकरणे, कोळशाचे वायूकरण, मत्स्यउद्योग, आयुर्वेद, दुग्धउत्पादन आणि अशा विविध क्षेत्रांविषयी वैविध्यपूर्ण सत्रे आणि चर्चासत्रांचा समावेश होता. अखंड व्यावसायिक परिसंस्था निर्माण करण्यातील संभाव्य आव्हाने व त्यावरील उपाययोजनांविषयी तसेच या प्रांताच्या विकासातील वाढीवर चर्चा करण्यासाठी यावेळी राज्य आणि केंद्र सरकारचे ज्येष्ठ मंत्री, विविध उद्योगक्षेत्रातील धडाडीचे नेते आणि प्रख्यात शैक्षणिक संस्था, तज्ज्ञ व विचारवंत एकत्र आले.
कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या दिवशी झालेल्या चर्चेमध्ये या प्रांताच्या क्षमता, कुशल मनुष्यबळाची उपलब्धता, भौगोलिक फायदे आणि उपक्रमास पुढे नेण्यासाठी व त्याविषयी जागरुकता वाढविण्यासाठीचे प्रयत्न हे विषय केंद्रस्थानी होते. त्याशिवाय, या प्रांतामध्ये गुंतवणूकीसाठी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याच्या विषयावरही भर देण्यात आला. उपक्रमामध्ये या दिवशी या प्रांतातील स्टार्टअप परीसंस्था, शिक्षण, हवाई उड्डाण, संरक्षण, मौल्यवान रत्ने व दागिने आणि अन्न प्रक्रिया उद्योगक्षेत्रावर बीजभाषणे आणि चर्चा पार पडल्या. विदर्भातील स्टार्टअप्सना वित्तीय पाठबळ पुरविणाऱ्या एंजल गुंतवणूकदारांबरोबर झालेल्या २५ सामंजस्य करारांनी पहिल्या दिवसाची सांगता झाली.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी बांबू उद्योगाची प्रगती आणि एमएसएमई, स्टार्टअप्स, औषधनिर्मिती, आयटी आणि आयटीईएस, बांधकाम व स्टील आणि पीईबी क्षेत्रांसाठी व्यावसायिक संधींचा शोध व निर्मिती या विषयांवर सखोल चर्चा पार पडल्या. कोळशाचे वायूकरण, कार्बन उत्सर्ग कमी करण्यासाठीचे प्रयत्न आणि पर्यायी इंधनाच्या दिशेने परिवर्तन यांच्या महत्त्वावरही विशेषत्वाने भर देण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी मत्स्यउद्योग, दुग्धउत्पादन आणि आयुर्वेद या उद्योगक्षेत्रांच्या विस्तारासाठी या प्रांताकडे असलेल्या संभाव्य क्षमता वापरात आणण्याविषयी विचारमंथन आणि परिसंवाद पार पडले. या चर्चांमध्ये रोजगार निर्मितीसाठी स्थानिक युवकांना प्रशिक्षित करणे आणि विविध उद्योगक्षेत्रे विकसित करणे, खाणकामासाठी उपकरणांची तरतूद, लॉजिस्टिक आणि गोदाम सुविधा, आयटी आणि आयटीईएस व वित्तपुरठा या विषयसूत्रांचाही समावेश होता.
