Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

असंघटित कष्टकरी कामगार महासंघाच्या लढ्याला यश…..

पिंपरी : बार्शी शहरातील ७० ते ८० कर्मचाऱ्यांनी हिंजवडीतील भारत व्हिजन ग्रुप B.V.G या कंपनीच्या समोर आमरण उपोषण सुरू केले होते. बार्शी नगरपरिषदेत या कंपनीचे साफसफाई व कचरा उचलण्याचे कंत्राट होते .२५० सफाई कामगारांनी बार्शी नगरपरिषदेमधे २०१६ ते २०२२ BVG या नामांकित कंपनीकडे कंत्राटी पद्धतीने काम केले .कंपनीने कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युटी दिली नाही. वारंवार मागणी करून देखील त्यांच्या पदरी निराशाच येत असल्याने त्यांनी कंपनीच्या मुख्यालया समोर आमरण उपोषण करण्याचे ठरवले व त्यांनी असंघटित कष्टकरी कामगार महासंघाकडे धाव घेतली. संघाचे अध्यक्ष संदिपान झोंबाडे यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण सुरू केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष तुषार कामठे व सामाजिक न्याय विभाग चे अध्यक्ष मयुर जाधव यांनी बी.व्ही.जी. कंपनीच्या मालकांशी संपर्क साधून चर्चा केली व तात्काळ सर्व कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात आली.
या आंदोलनामुळे कंपनीचे डोके ठिकाणावर आले आणि कंपनीने ताबडतोब १२० कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्युटीची रक्कम त्यांच्या खात्यात जमा केली .
” कंत्राटी कामगारांना सरकारी नियमानुसार किमान वेतन दर देणे असताना अनेक कामगारांना तुटपुंज्या स्वरूपाचे वेतन दिले जाते अनेक कामगारांना पी.एफ चे पैसे देखील वेळेवर दिले जात नाही. त्यांना साधन सामग्री पुरवली जात नाही कामगारांचा अपघात झाल्यास त्यात ते जखमी अथवा मृत पावल्यास त्यांना रक्कम देणे अपेक्षित असताना ति वेळेवर दिली जात नाहीत. राट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय पवार साहेबांच्या विचारानुसार कष्टकरी, शोषित ,वंचित असंघटित क्षेत्रातील कामगार यांच्या पाठिशी सदैव आहेत.” असे तुषार कामठे म्हणाले.
“असंघटित क्षेत्रातील कामगार हे सर्व बहुजन समाजातीलच असतात वारंवार त्यांच्यावर अन्याय होतो. आर्थिक मागासलेपण दुर करण्यासाठी हाताला मिळेल ते काम करतात परंतू त्यांच्या हातात शुल्लक रक्कम दिली जाते. शिक्षणाचा अभाव असल्याने त्यांची ठेकेदार मंडळी फसवणूक करतात. या कामगारांच्या पाठीशी सामाजिक न्याय विभाग खंबीरपणे उभा आहे.” असे अध्यक्ष मयुर जाधव यांनी म्हटले आहे.
असंघटित क्षेत्रातील कामगार हा वेठबिगारी, घरकाम करणाऱ्या महिला, काच कागद पत्रा वेचक महिला यासह अनेक प्रकारचे असंघटित कामगार हे शहरातील झोपडपट्टीत राहतात त्याच्या गरजा भागवण्यासाठी त्यांना धडपड करावी लागते त्यासाठी हाताला मिळेल ते काम करण्यासाठी ते धडपडत असतात. मोठ मोठाले ठेकेदार हे हुकूमशाही भांडवलदार आहेत त्यांना कष्टकरी कामगारांचे शोषण करणे एवढेच माहिती आहे. आज पिंपरी-चिंचवड शहरात लाखोंच्या वर असंघटित क्षेत्रातील कामगार काम करत आहेत. त्यांना वारंवार अशा परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे.यासाठीच
असंघटित कष्टकरी कामगार महासंघ लढत आहे येथून पुढे कोणत्याही कामगारांवर अन्याय अत्याचार होत असेल तर आमच्याशी तात्काळ संपर्क साधा असे संघाचे अध्यक्ष संदिपान झोंबाडे यांनी म्हटले आहे.

यावेळी असंघटित कष्टकरी कामगार महासंघाचे कार्याध्यक्ष प्रल्हाद कांबळे , विकास जगधने , बार्शीचे अतुल पेटाडे , मकरंद बोककोडे यांच्यासह अनेक कामगार उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading