Tuesday, June 16, 2026
Latest NewsSports

एमएसीए इलेव्हन संघाला विजेतेपद !!

पुणे : इन्स्टिट्युट ऑफ चार्टर अकाऊंटस् ऑफ इंडियाच्या डब्ल्युआयआरसी पुणे शाखा तर्फे आयोजित ११ व्या ‘श्री रामकृष्ण ऑईल मिल्स् करंडक’ सीए क्रिकेट लीग (सीएसीएल) २०२४ स्पर्धेत एमएसीए इलेव्हन संघाने रॉयल्स् इलेव्हन संघाचा ८ गडी राखून पराभव करत विजेतेपदाला गवसणी घातली.

शिंदे हायस्कूल, सहकारनगर येथील मैदानावर झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सागर सी. याच्या ६१ धावांच्या जोरावर एमएसीए इलेव्हन संघाने विजेतेपद मिळवले. पहिल्यांदा फलंदाजी करताना रॉयल्स् इलेव्हन संघाने १० षटकामध्ये ८१ धावांचे लक्ष्य उभे केले. कुणाल जमावर याने नाबाद ४५ धावांची खेळी केली आणि संघाला समाधानकारक धावसंख्या उभी करून दिली. या आव्हानाचा पाठलाग करताना एमएसीए इलेव्हन संघाच्या सलामीवीरांनी दमदार सुरूवात केली. सागर सी. याने २१ चेंडूत ७ चौकार आणि ५ षटकारांसह ६१ धावांची स्फोटक खेळी केली. भावेश चौधरी याने १४ धावा करून साथ दिली. या दोघांनी २८ चेंडूत ७४ धावांची दमदार सलामी दिली. या जोरावरच एमएसीए इलेव्हनने ६.३ षटकामध्ये लक्ष्य साधत विजेतेपद संपादन केले.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण श्री रामकृष्ण ऑईल मिल्स्चे संचालक आनंद पटेल, घनाशाम पटेल आणि ध्रुव पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डब्ल्युआयआरसीचे माजी उपाध्यक्ष सीए सर्वेश जोशी आणि पुणे शाखेचे अध्यक्ष राजेश अगरवाल, स्पर्धेचे संचालक राजेश मेहता, सचिन पारेख, योगेश पोद्दार, संघाचे खेळाडू आदि मान्यवर उपस्थित होते.

विजेत्या एमएसीए इलेव्हन आणि उपविजेत्या रॉयल्स् संघांना करंडक आणि मेडल्स् देण्यात आले. या शिवाय वैयक्तिक पारितोषिकांमध्ये स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि सर्वोत्कृष्ट फलंदाज हे दोन्ही मान रॉयल्स् संघाच्या निपुण भंडारी याला मिळाले. सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा मान नकूल चौधरी याला तर, सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा मान प्रतिक कापारे यांना मिळाला.

सामन्याचा संक्षिप्त निकालः अंतिम सामनाः
रॉयल्स् इलेव्हनः १० षटकात ४ गडी बाद ८१ धावा (कुणाल जमावर नाबाद ४५ (३१, ५ चौकार, १ षटकार), तेजस बंसल १४, हर्षल नायडु १-८, शुभम जाजू १-११) पराभूत वि. एमएसीए इलेव्हनः ६.३ षटकात २ गडी बाद ८२ धावा (सागर सी. ६१ (२१, ७ चौकार, ५ षटकार), भावेश चौधरी १४, सजिय पवार १-१५, आगम शहा १-१७);(भागिदारीः पहिल्या गड्यासाठी सागर आणि भावेश ७४ (२८); सामनावीरः सागर सी.;

तृतीय स्थानासाठीचा सामनाः
एएनआरके डायनामोज्ः ८ षटकात ४ गडी बाद १०० धावा (ब्रिजभुषण तिवारी २१, नागराज जाधव ३०, ऋषीकेश वांढेकर २६, जिग्नेश शिंघवी १-१२) वि.वि. एसबीएच स्मॅशर्सः ८ षटकात ६ गडी बाद ६९ धावा (सोहम बाथे नाबाद २८, प्रणव गुप्ता १५, भुषण राठी २-५, नकूल चौधरी २-२२); सामनावीरः नागराज जाधव;

वैयक्तिक पारितोषिकेः
स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडूः निपुण भंडारी (रॉयल्स्);
सर्वोत्कृष्ट फलंदाजः निपुण भंडारी (रॉयल्स्, २०७ धावा);
सर्वोत्कृष्ट गोलंदाजः नकूल चौधरी (एएनआरके डायनामोज्, ११ विकेट);
सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकः प्रतिक कापारे (एएनआरके डायनामोज्, १० विकेट);

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading