Monday, October 5, 2026
Latest NewsMAHARASHTRANATIONALPUNETOP NEWS

FTII मध्ये राम मंदिरावरून राडा

पुणे : फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII)च्या कॅम्पसमध्ये आज (दी. २३) दुपारी  विद्यार्थी संघटनेने लावलेल्या बॅनरवरून मोठा राडा झाला आहे. एकीकडे देशात आयोध्येतील श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचे वातावरण असताना, FTIIमध्ये मात्र, 1992 मध्ये मशीद पाडल्याचा संदर्भ देत बॅनरवर “बाबरी, संविधानाचा मृत्यू लक्षात ठेवा” असे लिहिले फलक लावण्यात आले होते. यावरून उजव्या विचार सरणीच्या कार्यकर्त्यांमध्ये अन् FTII च्या विद्यार्थ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचे चित्र आहे. 

डेक्कन जिमखाना पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील लॉ कॉलेज रोडवर असलेल्या FTII कॅम्पसमध्ये दुपारी 2.00 वाजता ही घटना घडली.  विद्यार्थ्यांनी लावलेल्या बॅनरवर “बाबरी, संविधानाचा मृत्यू लक्षात ठेवा,” असे लिहिले होते. मंगळवारी दुपारी, वेगवेगळ्या उजव्या विचारसरणीच्या काही व्यक्तींनी एफटीआयआय कॅम्पसमध्ये बळजबरीने प्रवेश केला. जोरदार घोषणाबाजी करत अन् अपशब्द वापरत बॅनर काढून टाकला अन् जाळला. यावेळी, एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांचा एक गट आणि उजव्या विचारसरणीच्या संघटनांच्या सदस्यांमध्ये हाणामारी झाली. यामध्ये FTIIचे अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. 

दरम्यान, डेक्कन जिमखाना पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळताच पथके रवाना करण्यात आली. पोलिसांनी कारवाई केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading