Sunday, November 29, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

भिडे वाड्यापासून पुणे महापालिकेपर्यंत निघाली सत्यशोधक रॅली; अभिरूप सभेतून महात्मा फुलेंच्या विचारांचा जागर.

पुणे  : महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जन्मद्विशताब्दी वर्षानिमित्त पुणे महानगरपालिकेच्या वतीने शुक्रवारी सत्यशोधक रॅली आणि अभिरूप सभेचे आयोजन करण्यात आले. ऐतिहासिक भिडे वाडा येथून दुपारी २.०० वाजता संविधानाच्या प्रतीस पुष्पहार अर्पण करून या रॅलीला सुरुवात झाली.

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या वेशातील कलाकार पारंपरिक बग्गीतून या रॅलीत सहभागी झाले होते. भिडे वाडा येथून अप्पा बळवंत चौक मार्गे रॅली पुणे महानगरपालिकेत पोहोचली. महापालिका भवनातील श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले सदर ठिकाणी मा.मंजुषा नागपुरे महापौर पुणे , मा.परशुराम वाडेकर उपमहापौर पुणे, मा.श्रीनाथ भिमाले अध्यक्ष,स्थायी समिती , मा.निलेश निकम विरोधी पक्ष नेते,मा.सोपान चव्हाण गटनेते राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मा.नवल किशोर राम आयुक्त पुणे महानगरपालिका, मा.प्रजीत नायर अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट) उपस्थित होते.

त्यानंतर सायंकाळी ४.०० वाजता पुणे महानगरपालिकेच्या नवीन सभागृहात अभिरूप सभेला सुरुवात झाली. या सभेला मा.मंजुषा नागपुरे महापौर पुणे ,मा.परशुराम वाडेकर उपमहापौर पुणे, मा.श्रीनाथ भिमाले अध्यक्ष,स्थायी समिती , मा.निलेश निकम विरोधी पक्ष ,मा.सोपान चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट नेते) मा.ओमप्रकाश दिवटे अतिरिक्त आयुक्त (विशेष) व सर्व पक्षांचे गटनेते, नगरसेवक आणि अधिकारी उपस्थित होते. तसेच काही निमंत्रित नागरिकांनी प्रेक्षक गॅलरीतून सभेचे कामकाज पाहिले.
महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला आयोजित या उपक्रमातून त्यांच्या सत्यशोधक विचारांचा जागर करण्यात आला. तसेच पुणे महानगरपालिकेच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले जन्मद्विशताब्दी आणि चवदार तळे शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमांची सुरुवात या उपक्रमाने झाली.
समता, सामाजिक न्याय, शिक्षण आणि स्त्री-पुरुष समानतेचा विचार समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने शहराचे उपमहापौर मा.परशुराम वाडेकर यांच्या विशेष प्रयत्नातून आयोजित सत्यशोधक रॅली आणि अभिरूप सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

Leave a Reply