Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

सरहद महाविद्यालयात सांस्कृतिक विभागातर्फे ‘स्पॉटलाईट’ राष्ट्रीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचे आयोजन  

पुणे : सरहद कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, कात्रज, पुणे येथे  सांस्कृतिक विभागातर्फे दिनांक २० जानेवारी २०२४ रोजी
“स्पॉटलाईट” (२०२३-२४) या राष्ट्रीय  स्तरावरील आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली.  सर्व पाहुण्यांचे आणि उपस्थितांचे औपचारिक स्वागत करण्यात आले. उपप्राचार्य डॉ. संगीता शिंदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व विद्यार्थ्याना  बहुमूल्य असे मार्गदर्शन केले. नृत्य,गायन, फॅशन शो, आणि पोस्टर स्पर्धा हे या दिवसाचे आकर्षण होते. सरहद आणि इतर 25 महाविद्यालयातील 580  विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये  सहभाग घेतला आणि पारितोषिके मिळविली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विविध कौशल्यांचा विकास घडविणे आणि  विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन करता यावे या हेतूने आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून युवा सामाजिक माध्यमे प्रभावक (social media influencer) मा. अथर्व सुदामे, मा. प्रणाली मेहर, मा. मजहर सिद्दिकी, मा. मंजूर राथेर, मा.शमीमा अख्तर , मंगेश शिंदे, मा. लौकिक पानसरे , सरहद शिक्षण संस्थेचे संस्थापक माननीय श्री संजय नहार सर, विश्वस्त मा.शैलेश वाडेकर मा. अनुज नहार सर सपत्नीक उपस्थित होते. मा. प्रणाली मेहर, मा. मजहर सिद्दिकी, मा. मंजूर राथेर मा. शमीमा अख्तर मा मंगेश शिंदे, मा. लौकिक पानसरे यांनी विविध स्पर्धांचे परीक्षण केले. सर्व मान्यवरांच्या हस्ते
पारितोषिक वितरण समारंभ अत्यंत जल्लोषामध्ये पार पडला .

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंग्रजी विभाग प्रमुख डॉक्टर अनुपमा वाटकर तसेच चैत्राली गोडावले  व उपेक्षा वनशिव या दोन विद्यार्थिनींनी केले.सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर पल्लवी पाटील व सांस्कृतिक विभाग समन्वयक डॉ स्वप्ना थोरगुले तसेच महाविद्यालयातील सर्व विभागातील विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मोलाच्या प्रयत्नांमुळे हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading