Friday, June 26, 2026
Latest NewsPUNE

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात इंटरनॅशनल यूथ फेस्टिव्हल

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आजपासून ‘इंटरनॅशनल यूथ फेस्टिव्हल’ला सुरूवात झाली. विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय सेंटरद्वारे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या या फेस्टिव्हलचे उद्धाटन प्र-कुलगुरू प्रा.(डॉ). पराग काळकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव आणि आंतरराष्ट्रीय सेंटरचे संचालक प्रा.(डॉ.) विजय खरे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य श्री. रविंद्र शिंगणापूरकर, उपकुलसचिव श्री. मुंजाजी रासवे, डॉ. वैशाली साकोरे, श्री. प्रसाद कुळकर्णी उपस्थित होते.

मुला-मुलींसाठी स्वतंत्र फुटबॉल स्पर्धेसह क्रीडा महोत्सव, खाद्य महोत्सव आणि सांस्कृतिक महोत्सव या कार्यक्रमाचा भाग असणार आहे. १९ जानेवारी ते १० फेब्रुवारी दरम्यान चालणाऱ्या या फेस्टिव्हलची सुरूवात आज फुटबॉल मॅचपासून झाली. विद्यापीठातील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समधील फुटबॉल ग्राउंडमध्ये आज मुलांची मॅच संपन्न झाली. नेपाळ आणि तुर्कमेनिस्तान दरम्यान झालेल्या या मॅचमध्ये नेपाळने विजय मिळवला. या स्पर्धेत १५ देशांचे १५ मुलांचे आणि ३ मुलींचे संघ सहभागी झाले आहेत. या फेस्टिव्हल अंतर्गत ५ फेब्रुवारीला खाद्य महोत्सवाचे तर १० फ्रेबुवारीला सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading