रांका ज्वेलर्सचा लक्षणीय उपक्रम – ‘प्रत्येक घरात राम, प्रत्येक घर राममंदिर’
पुणे : येत्या २२ जानेवारी रोजी प्रभू श्रीरामचंद्र यांच्या मूर्तीची अयोध्येतील भव्य आणि सुंदर मंदिरात प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. यावेळी संपूर्ण भारतात पूजाअर्चा, घंटानाद असे अनेक उपक्रम होणार असून प्रत्येक घरी दिवे लावून दिवाळी साजरी करण्यात येईल. प्रभू श्रीरामांप्रति आपल्या मनात असणाऱ्या अशाच उत्कट श्रध्दाभावाला मूर्त स्वरूप देण्यासाठी पुण्यातील सुप्रसिद्ध रांका ज्वेलर्सने ‘प्रत्येक घरात राम, प्रत्येक घर राममंदिर’ हा लक्षणीय उपक्रम पुणेकरांसमोर सादर केला आहे. ज्यावेळेला अयोध्येतील श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामांची मूर्ती विराजमान होत असेल तेव्हा आपल्याही घरातील राममंदिर उजळून निघेल आणि प्रभू श्रीरामांचे आपल्याही घरात आगमन होईल, ही त्यामागील भावना आहे.
यासाठी रांका ज्वेलर्सने अयोध्येतील श्रीराम मंदिराची हुबेहुब चांदीची, धातूची व लाकडाची प्रतिकृती, चांदीच्या फ्रेम्स सर्वसामान्य ग्राहकांना परवडेल अशा रास्त किंमतीत तयार करून त्यांना उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यासोबतच श्रीराम, सीतामाई, लक्ष्मण आणि रामभक्त हनुमान अशा सुंदर ‘राम दरबार’ची निर्मिती देखील रांका ज्वेलर्सतर्फे करण्यात आलेली आहे. या दोन्ही प्रतीकांमधून ‘प्रत्येक घरात राम आणि प्रत्येक घर राममंदिर’ ही संकल्पना आम्ही पुणेकरांसमोर आणत असल्याचे रांका ज्वेलर्सचे संचालक फतेचंद रांका व ओमप्रकाश रांका यांनी सांगितले.
प्रभू श्रीरामांचे मंदिर ही केवळ एक वास्तू नाही तर देशातील प्रत्येकासाठी आस्थेचा विषय आहे. जगातल्या सर्व हिंदूसाठी श्रीराम मंदिर हे एक ऊर्जेचे केंद्र आहे. प्रभू श्रीरामाची हीच ऊर्जा आपल्या घरातही असावी, या उद्देशातून वस्तुपाल रांका यांनी श्रीराम मंदिराच्या आराखड्याचा पूर्ण अभ्यास करून श्रीराम मंदिराची हुबेहुब प्रतिकृती साकारण्यात पुढाकार घेतला असल्याचेही रांका यावेळी म्हणाले.
अयोध्येतील मंदिर हे साधारण ५५ हजार स्क्वेअर फुटांवर बांधलेल दुमजली मंदिर असून वास्तुकलेचा देखील सुंदर आविष्कार आहे. त्यामुळे या संपूर्ण मंदिराच्या आराखड्याचा बारकाईने विचार करून आणि त्यातील प्रत्येक तपशीलांचा अभ्यास करून, अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरही विचार करून आम्ही ही प्रतिकृती साकारली आहे. हे मंदिर साकारताना चांदी आणि अँटिक या दोन धातूंचा प्रामुख्याने विचार केलेला आहे. या धातूंमध्ये मंदिर साकारायचे तर त्यावर हस्तकारागिरी केली तरच तपशील अधिक ठळक दिसतील या विचारातून २०- २५ कारागिरांनी हे मंदिर स्वतःच्या हातांनी घडविलेले आहे. इथे चांदी हा धातू वापरण्याचे आणखी कारण म्हणजे चांदी ही ऊर्जाधारक आहे, असे वस्तुपाल रांका म्हणाले.
श्रीराम मंदिराच्या या प्रतिकृतीतून प्रभू श्रीरामांची ऊर्जा घराघराला लाभावी, हा प्रमुख उद्देश असल्याचे शैलेश रांका यांनी नमूद केले. मंदिराची पहिली प्रतिकृती तयार झाल्यावर विविध आकारांचा विचार करण्यात आला. त्यादृष्टीकोनातून ४०० ग्रॅम, ६०० ग्रॅम, ११०० ग्रॅम व २ किलो चांदी वापरून विविध आकारातील मंदिरांच्या प्रतिकृती घडविण्यात आलेल्या आहेत. ही प्रतिकृती इतकी हुबेहुब आहे की, अयोध्येतील श्रीराम मंदिर आपल्या घरात आहे, असे वाटावे. या प्रतिकृतीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये लाईट / प्रकाश व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी हे जेव्हा श्रीराममंदिर उजळून निघते तेव्हा आपल्या हृदयाचा गाभारा देखील प्रकाशित होतो. यासाठी ९२.५% शुध्द चांदीचा वापर करण्यात आलेला असल्यामुळे रांका ज्वेलर्स तर्फे शुध्द चांदीची गुणवत्ता देखील जपण्यात आलेली आहे. पुणेकरांना ही चांदीची राम मंदिराची प्रतिकृती निश्चितच आवडेल, असा विश्वास शैलेश रांका यांनी व्यक्त केला.
चांदीतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती हा आमच्या व्यवसायाचा भाग नसला तरी समस्त हिंदू धर्मियांसाठी गर्वाची आणि अभिमानाची बाब असल्याने आम्ही ती साकारली असल्याच्या भावना फतेचंद रांका व ओमप्रकाश रांका यांनी मांडल्या.
चांदीसोबतच लाकडातील श्रीराम मंदिराच्या प्रतिकृती देखील रांकांतर्फे घडविण्यात आल्या असून ज्या पुणेकरांना चांदीतील प्रतिकृती घेणे आर्थिकदृष्ट्या अवघड असेल अशा भाविकांसाठी आम्ही लाकडातील प्रतिकृती देखील उपलब्ध करून दिल्या आहेत याबरोबरच राम दरबार हा वॅक्स मार्बल पावडरमध्ये देखील उपलब्ध आहे. श्रीराम दरबारातील मूर्ती देखील सुबकतेने घडविण्यात आल्या असून त्या प्रत्यक्ष जिवंत वाटाव्यात इतक्या सुंदर झाल्या आहेत. चेहऱ्यावरील प्रसन्न भावासोबतच या आराध्य देवतांची वस्त्रे, आभूषणे, गळ्यातील हार, धनुष्य, जानवे, हनुमानाची गदा, पायातील तोडे अशा अनेक बारीक तपशीलातील गोष्टी देखील कलात्मकतेने साकारण्यात आलेल्या आहेत. हा रामदरबार १०० ग्रॅमपासून ते २ किलोपर्यंतच्या शुध्द चांदीमध्ये घडविण्यात आलेला आहे. यामध्येही ९२.५ % शुध्दतेची चांदी वापरण्यात आल्यामुळे गुणवत्तेचीही खात्री मिळत असल्याचे डॉ रमेश रांका व अनिल रांका यांनी सांगितले. विविध आकारांमध्ये घडविण्यात आलेल्या श्रीराम दरबाराच्या प्रतिकृती घडवताना त्यामध्ये चांदीचा वापर हा ऊर्जानिर्मितीसाठी करण्यात आलेला असून आपल्या आराध्य देवतांची सकारात्मक ऊर्जा आपल्याला लाभावी असे फतेचंद रांका म्हणाले.
प्रभू श्रीराम मंदिरात श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेच्या सुवर्णक्षणानिमित्त रांका ज्वेलर्सतर्फे श्रीरामदरबार व श्रीराम मंदिराचेचे चित्र असलेली चांदीची नाणीही निर्माण करण्यात आली आहेत. ९२.५ % शुध्द चांदी वापरून १० व २० ग्रॅमची ही नाणी घडविण्यात आली असल्याची माहिती तेजपाल रांका यांनी दिली. श्रीराम मंदिराच्या प्रतिकृती, श्रीराम दरबार व चांदीची नाणी रांका ज्वेलर्सच्या सर्व शोरूममध्ये पुणेकरांना पाहण्यासाठी व विक्रीसाठी ठेवण्यात आलेली आहेत.
