Tuesday, June 16, 2026
BusinessLatest NewsPUNE

स्वयं-पुनर्विकास करू इच्छिणाऱ्या गृहरचना संस्थांसाठी गोखले कन्स्ट्रक्शन्सतर्फे ‘राईज’ उपक्रमाची घोषणा

पुणे : जुन्या गृहरचना संस्थांचा पुनर्विकास करण्यात आघाडीचे नाव असलेल्या पुण्यातील गोखले कन्स्ट्रक्शन्सतर्फे पुनर्विकास क्षेत्रात एका नवीन अध्यायाची सुरुवात करत स्वयं-पुनर्विकास करू इच्छिणाऱ्या गृहरचना संस्थांसाठी  ‘राईज’ (रिडेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह फॉर सेल्फ एम्पॉवर्ड) हा अनोखा उपक्रम सुरु करण्यात येत आहे. येत्या २० जानेवारीला असलेल्या संस्थेच्या १९ व्या स्थापना दिवसाचे औचित्य साधत प्रथमच स्वयं-पुनर्विकास (सेल्फ रिडेव्हलपमेंट) करू पाहणाऱ्या गृहरचना संस्था, अपार्टमेंट व बंगले यांच्यासाठी एक अत्यंत नाविन्यपूर्ण व आर्थिक दृष्ट्या लाभदायक असा उपक्रम सादर करत असल्याची घोषणा गोखले कन्स्ट्रक्शन्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विशाल गोखले यांनी केली.

याविषयी माहिती देताना विशाल गोखले म्हणाले, “आजवर १७५ हून अधिक जुन्या गृहरचना संस्थांचा पुनर्विकास करून कायापालट केल्याचा भक्कम अनुभव आमच्या गाठीशी आहे. त्यामुळे स्वयं-पुनर्विकास करू पाहणाऱ्या सोसायट्यांच्या नेमक्या गरजा व अडचणी ओळखून आम्ही ‘राईज’ उपक्रमाची आखणी केली आहे. ‘राईज’ उपक्रमाच्या माध्यामातुन प्रथमच स्वयं-पुनर्विकास करू इच्छिणाऱ्या गृहरचना संस्थांना पुनर्विकासामुळे निर्मित झालेल्या नवीन सदनिकांच्या विक्रीतून मिळणारा नफा सोसायटीच्या किंवा सभासदांच्या खात्यात जमा होण्याची मोठी संधी मिळणार आहे. अशा प्रकारचा पर्याय स्वयं-पुनर्विकास करणाऱ्या गृहरचना संस्थांना कोणत्याही प्रतिथयश रिअल इस्टेट डेव्हलपर कडून मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.”

“गोखले कन्स्ट्रक्शन्स एक निश्चित शुल्क (फिक्स्ड फी) आकारून स्वयं-पुनर्विकास करणाऱ्या सोसायटीला ‘राईज’ उपक्रमाच्या माध्यमातून पुनर्विकास करण्यासाठी लागणारा निधी किंवा भांडवल अधिकृत बँका किंवा वित्तीय संस्थाकडून उपलब्ध करून देणे, विविध परवानग्या मिळवण्यासाठी असणारी क्लिष्ट प्रक्रिया पूर्ण करून देणे, उच्च दर्जाचे बांधकाम वेळेत पूर्ण करणे याबरोबरच पुनर्विकासामुळे उपलब्ध झालेल्या नवीन सदनिकांची विक्री करून देणे अशा सर्व सेवा देण्यासाठी कटिबद्ध असेल”, असे गोखले यांनी सांगितले.

महत्वाचे म्हणजे स्वयं-पुनर्विकासासाठी लागणारा निधी अधिकृत बँका किंवा वित्तीय संस्थाकडून उपलब्ध करून देताना गोखले कन्स्ट्रक्शन्स स्वतः गॅरेंटर राहून निधी उभारणीची प्रक्रिया सोपी करून देण्यासाठी पुढाकार घेईल असे गोखले यांनी आवर्जून नमूद केले.

‘राईज’ उपक्रमामुळे पुनर्विकास क्षेत्राला एक नवीन दिशा मिळण्याबरोबरच स्वयं-पुनर्विकास करू पाहणाऱ्या गृहरचना संस्थांना एक समर्थ पर्याय उपलब्ध होईल. ज्यामध्ये आधीपेक्षा आकाराने मोठी सदनिका, आधुनिक सोयी – सुविधा व मोठा आर्थिक लाभ असे तिहेरी फायदे राईजच्या माध्यमातून स्वयं-पुनर्विकास करणाऱ्या गृहरचना संस्थांना मिळवता येतील.

राईज’ या उपक्रमात सहभागी होणाऱ्या सर्व सोसायट्या, अपार्टमेंट व बंगले यांना सर्व सेवा सुलभ रीतीने मिळाव्यात यासाठी तज्ञांची एक समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीमध्ये ए अँड टी कन्सल्टंट्सचे आर्किटेक्ट मनोज तातूसकर आणि आर्किटेक्ट विकास अचलकर, अभिजित केंजळे, अॅड उदयकुमार कुलकर्णी, अॅड. श्रीपाद खुर्जेकर, एसजे रानडे आणि कंपनीचे सीए सुजय जयंत रानडे, जी. डी. आपटे आणि कंपनीचे सीए प्रणव आपटे, पराग चोपडा, पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट फेडरेशनचे अध्यक्ष सुहास पटवर्धन यांचा समावेश आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading