Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

ठाकरे व शिंदे गटाचे सगळेच आमदार पात्र – राहूल नार्वेकर

मुंबई : सुमारे दीड वर्षापूर्वी महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाल्यावर, शिवसेनेच्या कोणत्या गटाचे आमदार पात्र किंवा अपात्र यावर आज विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी निकाल दिला. यावेळी एकनाथ शिंदे गटाला अधिकृत शिवसेना असल्याचे सांगत शिंदे गटाच्या सुनील प्रभू यांचा व्हीप वैध मानला. मात्र असे करताना शिवसेना पक्षातील दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवल्याचा ऐतिहासिक निर्णय विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी दिला आहे.

नार्वेकर यांनी दिलेल्या निकाला नुसार, निवडणूक आयोगाकडे 2018 ची शिवसेना पक्षाच्या घटनेची नोंद नाही. त्यामुळे पक्ष प्रमुखाला थेट कुणालाही पक्षातून काढण्याचा अधिकार नाही. त्यामुळे एकनाथ शिंदेंना काढण्याचा ठाकरेंना कोणताही अधिकार नाही. राष्ट्रीय कार्यकरणीसोबत चर्चा करुनच पक्षातून हकालपट्टीचा निर्णय घेता येतो. त्यामुळे शिंदे यांना विधिमंडळ गटनेतेपदावरून हटवण्याचा अधिकार नाही. त्यामुळे शिंदे गटाचा भरत गोगावले यांचा व्हीप हा कायदेशीर मानत  मनात शिंदे गटाचे सर्व आमदार पात्र ठरवले आहेत.

मात्र यानंतर गोंगावलेंचा व्हीप न पाळल्याने उद्धव ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरले जाणार हे स्पष्ट होते. मात्र नार्वेकर यांनी शिंदे व ठाकरे गटाच्या परस्पर विरोधी याचिका फेटाळली असून सर्व आमदारांना पात्र ठरवले आहे. त्यामुळे ठाकरे गटात ‘थोडी खुशी ज्यादा गम’ असे वातावरण आहे.

विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर म्हणाले …..

  • शिंदे गटाच्या आमदारांनी पक्ष विरोधी कृत्य केलेले नाही
  • सुनील प्रभू यांना व्हीप जारी करण्याचा कोणताही अधिकार नाही.
  • प्रभूनां बैठक बोलावण्याचा अधिकार नाही
  • बैठकीला आलेले नाही म्हणून आमदार अपात्र ठरत नाहीत.
  • शिंदे गटाच्या भरत गोंगावलेंचा व्हीप वैध
  • शिवसेनेच्या २०१८ च्या घटनेची निवडणूक आयोगात नोंद नाही.
  • केवळ 10 व्या सूचीनुसार मी फक्त राजकीय नेतृत्व कोणते कायदेशीर  हे ठरवले.
  • पक्ष प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांना कोणालाही त्यांच्या पदावरून काढता येत नाही.
  •  पक्षातील नेते मिळून आपला नेता निवडू शकतात.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading