हा न्याय नव्हे तर राजकीय निवाडा – शरद पवार
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मे महिन्यात निकाल देताना म्हटंले आहे की, पक्षा विषयी निर्णय देताना पक्ष संघटना ही महत्वाची आहे. मात्र विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी न्यायालयाच्या गाईडलाईन नुसार निकाल न् देता विधीमंडळ पक्षाला जास्त महत्व दिले आहे. हा न्याय नसून निवडणुका डोळ्या समोर ठेवून केलेला राजकीय निवाडा आहे, अशी टीका राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.
शिवसेना पक्षातील फुट व राज्यातील सत्ता संघर्षा नंतर दीड वर्षा नंतर विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी आज आमदार अपात्रतेवर निकाल दिला. यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार माध्यमांशी बोलत होते.
शरद पवार म्हणाले, अनेकांनी निकाल लागण्यापूर्वी निकाला बाबत आपल्या प्रतिक्रिया दिल्या होत्या; त्यामुळे निकाल काय लागणार? हे स्पष्ट होते. नार्वेकरांनी निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला बगल दिली आहे. मे महिन्यात सुभाष देसाई विरूद्ध राज्य सरकारच्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने पक्षा विषयी निर्णय घेताना पक्ष संघटना महत्वाची असाते हे स्पष्ट केले आहे. मात्र नार्वेकरांनी विधीमंडळ पक्षाला जास्त महत्व दिले. वास्तविक व्हीप देण्याच्या अधिकार कोणाला द्यायचा? हे ठरवण्याचा अधिकार देखील पक्ष संघटनेलाच आहे. मात्र तरी देखील नार्वेकरांनी कोर्टाच्या निकालाला सोईस्करपणे बगल दिली आहे.
हा न्यायालयीन निकाल नाही तर राजकीय सोईने दिलेला निकाल आहे. सत्तेचा गैर वापर करीत हा निकाल देण्यात आलेला आहे. भारतीय घटनेतील १० वी सूची ही राजकारणाला दिशा देणारी आहे. मात्र नार्वेकरांकडून याचा चुकीचा अर्थ काढला गेला आहे, असेही पवार म्हणाले.
