Monday, June 22, 2026
Latest NewsPUNE

सहाय्यक अभियंता बबन धेंडे यांचा सेवापूर्ती कार्यगौरव सोहळा संपन्न

पुणे : महावितरणच्या स्वारगेट उपविभाग अंतर्गत मुकुंदनगर शाखेत सहाय्यक अभियंता असलेल्या  बबन धेंडे यांच्या सेवापूर्तीनिमित्त निरोप समारंभ नुकताच पत्रकार भवन येथे उत्साहात पार पडला. नागपूर येथून १९८८ साली सुरू झालेला त्यांचा मराविमंडळ व सध्याची महावितरण मधील प्रवास कोल्हापूर, इस्लामपूर असा होउन अखेर पुणे येथे ७ व एकुण ३५ वर्षे सेवा बजावून ३१ डिसेंबर २०२३ रोजी पूर्ण झाला.
या काळात विविध ठिकाणी व वेगवेगळया परिस्थितीत काम करताना प्रामाणिकपणा व कार्यतत्परता या उपजत गुणांमुळे ते नेहमीच ग्राहकाभिमुख राहिले. नागपूर व कोल्हापूर येथे शहरी भागामधे तर इस्लामपूर येथे ग्रामीण भागात काम करताना अनेकविध अडचणींचा सामना करीत ग्राहक सेवा व महावितरण कंपनीप्रती निष्ठा राखत त्यांनी आपली सेवा बजावली. पुण्यासारख्या मेट्रोसिटीमधे काम करताना अनुभवाच्या व स्वप्रवॄत्तीच्या जोरावर त्यांनी अतिशय उल्लेखनीय कामगीरी केली.
वरीष्ठ अधिकारी, कर्मचारी वर्ग व ग्राहक या त्रयीमध्ये समन्वय ठेउन व सर्वांना   समजून घेउन ते नेहमीच आपल्या कामामधे सकारात्मक राहीले. वीजपुरवठा बंद पडला तर ते स्वत: तेथे हजर असायचे… त्याला काळ वेळाचं बंधन नव्हतं. वीजपुरवठा खंडीत झाल्यानंतर जर पर्यायी व्यवस्था असेल तर ग्राहकांचा वीजपुरवठा अल्पावधीत सुरळीत करता येतो. अशी पर्यायी व्यवस्था मुकुंदनगर व गुलटेकडी या शाखांतर्गत उपलब्ध नव्हती. परंतु गुलटेकडी येथील उपकेंद्रामधून धेंडे सरांनी अशी व्यवस्था सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. आणि त्यांच्या या प्रयत्नांना यश येउन एकुण चार उपकेंद्रे आता एकमेकांना जोडले गेले आहेत.

नि:स्वार्थ वागणूक, प्रामाणिकपणा या गुणांमुळे ते आपल्या कर्मचारीवर्गात अतिशय प्रिय होते. कार्यालय व क्षेत्रामधील कामात त्यांच नेहमीच मार्गदर्शन असायचं.   मित्रपरिवारात देखील ते त्यांचा हसतमुखपणा, हजरजबाबीपणा व मदतीची तत्परता   यामुळे प्रिय होते. सुवाच्च अक्षर व सुंदर रेखाचित्रे ही तर त्यांची खासियत. अशा या अधिकाऱ्याच्या निरोप समारंभाला महावितरणचे वरीष्ठ अधिकारी, अभियंता व   कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. रास्तापेठ मंडळाचे अधिक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता तसेच पर्वती विभगाचे कार्यकारी अभियंता,  पदमावतीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांच्या समवेत पर्वती,  पदमावती,  टेस्टींग इ. ठिकाणचे अभियंते,  अधिकारी व मुकुंदनगर,गुलटेकडी,  स्वारगेट इ. ठिकाणचे कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. धेंडे सरांचा स्वभाव,  सौहार्दपूर्ण वागणं,  परिस्थिती हाताळण्याच कौशल्य यामुळे मनोगत व्यक्त करताना अनेकांना आपल्या भावना अनावर झाल्या होत्या. अशा या मनमिळावू, प्रामाणिक व तत्वनिष्ठ अभियंत्याला सेवानिवॄत्ती नंतरच्या   आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा देतच एका अत्यंत ह्रदय अशा या निरोप समारंभाची सांगता झाली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading