.. हे तर संत वाल्मिकी लिखीत ‘रामायणा’त लिहिलंय – जितेंद्र आव्हाड
शिर्डी : मी कधी ही अभ्यास न करता किंवा पुराव्या शिवाय बोलत नाही. मी जे बोललो ते संत वाल्मिकी लिखीत ‘रामायणा’त लिहिले आहे. मग वाल्मिकींवर गुन्हा दाखल करणार का? असा प्रश्न आज राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला. तसेच काल मी जे बोललो, त्यामुळे जर कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो, अशी भूमिकाही आव्हाडांनी यावेळी मांडली.
येत्या २२ जानेवारीला आयोध्येच्या राम मंदिरात राम लल्लाच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना होणार आहे. त्यामुळे देशात एक भक्तिमय वातावरण आहे. त्यातच काल राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी “राम आमच्या बहुजणांचा आहे. राम हा मांसाहार करणारा होता.”, असे वक्तव्य केले होते. त्यामुळे राज्यभर भारतीय जनता पक्षाच्या वतीने अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहेत. शिवाय नाशिकच्या पंचवटी पोलिस चौकीत साध्य संत हे आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आहे. यापार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, मी कधी ही अभ्यास न करता किंवा पुराव्या शिवाय बोलत नाही. मी जे बोललो ते ऋषी वाल्मिकी लिखीत ‘रामायणा’मध्ये लिहिले आहे. रामायणातील आयोध्या कांडमधील १०२ व्या श्लोकात मी बोललो ते खर असल्याचा पुरावा आहे. पण आपल्याकडे पुराव्यावर किंवा इतिहासावर विश्वास न ठेवता केवळ भावनांचा विचार केला जातो. आज ही राम मंदिराच्या रूपाने काही जण राजकारणासाठी त्याचा उपयोग करत आहेत. पण आमचा राम हा आमच्या हृदयात आहे. ज्यांच्या डोक्यात आजही वर्णव्यवस्था आहे. त्यांच्या विषयी काय बोलणार? मी बोलताना कोणाच्या भावना दुखावण्याचा माझा उद्देश नव्हता. पण काल मी केलेल्या वक्यव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्या बद्दल खेद व्यक्त करतो, असे ही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
