पीएमडीटीए मानांकन मिलिंद मारणे टेनिस अकादमी ब्रॉन्झ सिरिज २०२३ स्पर्धेत तनिश पाटील, ओवी मारणे यांना विजेतेपद
पुणे : पुना वेस्टर्न क्लब(सॉंगबर्ड) व मिलिंद मारणे टेनिस अकादमी यांच्या वतीने व पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या संलग्नतेने आयोजित पीएमडीटीए मानांकन मिलिंद मारणे टेनिस अकादमी ब्रॉन्झ सिरिज स्पर्धेत मुलांच्या गटात तनिश पाटीलने, तर मुलींच्या गटात ओवी मारणे यांनी विजेतेपद संपादन केले.
भूगाव येथील पुना वेस्टर्न क्लब येथे पार पडलेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात अंतिम फेरीच्या लढतीत अव्वल मानांकित ओवी मारणेने दुसऱ्या मानांकित शरण्या सावंतचा ४-०, ४-२ असा पराभव करून विजेतेपदाचा मान पटकवला. याआधीच्या अव्वल मानांकित ओवी मारणेने गौरी बागडेचा ७-३ असा तर, दुसऱ्या सामन्यात दुसऱ्या मानांकित शरण्या सावंतने सान्वी गोसावीचा ७-३ असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. ओवी मारणे हि पीवायसी हिंदू जिमखाना येथे प्रशिक्षक हेमंत बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.
मुलांच्या गटात अंतिम फेरीत अव्वल मानांकित तनिश पाटील याने रिषभ ए याचा ४-०, ४-१ असा पराभव करून विजेतेपद पटकावले. याआधीच्या उपांत्य फेरीच्या लढतीत अव्वल मानांकित तनिश पाटीलने चिन्मय मेहताचा ७-३ असा तर, रिषभ ए याने दुसऱ्या मानांकित आर्यन बॅनर्जीचा ७-३ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली.
स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तिपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण गारवा हॉटेलचे मालक व जेझेडचे अतुल इंगवले, इंग्सा मॉलचे मालक शंकर सणस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक मिलिंद मारणे, पीएमडीटीए सुपरवायझर तेजल कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
निकाल: १२ वर्षाखालील मुले: उपांत्य फेरी:तनिश पाटील(१)वि.वि.चिन्मय मेहता ७-३;रिषभ ए वि.वि.आर्यन बॅनर्जी(२) ७-३;अंतिम फेरी: तनिश पाटील(१)वि.वि.रिषभ ए ४-०, ४-१;
१२ वर्षाखालील मुली: उपांत्य फेरी:
ओवी मारणे(१) वि.वि.गौरी बागडे ७-३;शरण्या सावंत(२)वि.वि. सान्वी गोसावी ७-३;अंतिम फेरी: ओवी मारणे(१) वि.वि.शरण्या सावंत(२) ४-०, ४-२.
