‘दगडूशेठ’ गणपती ट्रस्टतर्फे विनामूल्य कॅन्सर उपचारांचा २०५ रुग्णांना लाभ
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत वर्षभरात २०५ रुग्णांनी घेतला मोफत कॅन्सर उपचारांचा लाभ घेतला. स्तनांचा कॅन्सर, तोंडाचा कॅन्सर, जिभेचा कॅन्सर, गर्भाशय कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर, आतड्यांचा, जठर कॅन्सर, पोटाचा कॅन्सर, स्वादुपिंड कॅन्सर.इ प्रकारच्या शस्त्रक्रिया ट्रस्टच्या माध्यमातून मोफत करुन दिल्या जातात.
कॅन्सर उपचाराकरीता डॉ.जगदीश शेजुळ, डॉ. प्रसन्ना देशमुख, डॉ. भुषण भळगट, डॉ राजभोज, डॉ व्होरा, डॉ चेतन देशमुख, डॉ वाटेगावकर तसेच पेट सिटी स्कॅन माफक दरात करुन देण्यासाठी विजय चव्हाण, सचिन माने यांनी बहुमोल सहकार्य केले. सूर्या सह्याद्री हॉस्पिटल, इंद्रायणी हॉस्पिटल, भारती हॉस्पिटल रीसर्च सेंटर, डॉ डी वाय पाटील हॉस्पिटल, पिंपरी, आदित्य बिर्ला मेमोरीयल हॉस्पिटल, ससून सर्वोपचार रुग्णालय, मणिपाल हॉस्पिटल, बाणेर अशा विविध रुग्णालयाच्या माध्यमातून कॅन्सरच्या सर्व शस्त्रक्रिया या मोफत स्वरुपात करुन दिल्या जातात. तसेच माफक दरात पेट सीटी स्कॅन मणिपाल हॉस्पिटल आणि आदित्य बिर्ला हॉस्पिटल येथे अत्यल्प दरात करुन देवून रुग्णास सहकार्य केले जाते.
डॉ जगदिश शेजुळ म्हणाले, दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या जय गणेश रुग्णसेवा अभियानाद्वारे अनेक कॅन्सरग्रस्त रुग्ण हे रेडीएशन थेरपी करीता आमच्या सुर्या सह्याद्री हॉस्पिटल येथे पाठविले असता आम्ही त्यांना योजनेच्यावतीने पुर्णपणे मोफत थेरपी करुन देत असतो. आरोग्य शिबिराच्या माध्यमातून जनजागृती करणेहे कार्य कौतुकास्पद आहे.
डॉ. नितिन गोसावी म्हणाले, दगडूशेठ ट्रस्टच्या जय गणेश रुग्णसेवा अभियानामुळे कॅन्सरग्रस्त रुग्णांना अधिकतम लाभ होण्यास मदत होते. आमच्या रुग्णालयात मोफत कॅन्सर उपचार दिले जातात तसेच त्यांच्या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आमच्याकडे विविध प्रकारचे कॅन्सर पेशंट हे पाठविले जातात व त्यांना आम्ही मोफत उपचार उपलब्ध करुन देत असतो हीच प्रत्यक्ष दगडूशेठ बाप्पाची सेवा आम्ही समजतो.
रुग्ण सायली सोमनाथ कंधारे म्हणाल्या, मला घश्याच्या कॅन्सर उपचार करीता ३ ते ४ लाख इतका खर्च सांगण्यात आला होता. परंतु दगडुशेठ ट्रस्टच्या रुग्णसेवा अभियानद्वारे सुर्या सह्याद्री हॉस्पिटल येथे सर्व उपचार मोफत स्वरुपात करुन देण्यासाठी संस्थेच पत्र दिले असता पुर्ण उपचार माझे मोफत स्वरुपात चालु आहेत, या अभियानद्वारे माझ्यासारख्या असंख्य कॅन्सर रुग्ण याचा लाभ घेत आहेत तरी मी दगडूशेठ ट्रस्टचे मनापासून आभार मानते.
