Thursday, June 18, 2026
Latest NewsPUNE

“कॅन्सल द कॅन्सर” उपक्रमात २३५ नागरिकांची मोफत कर्करोग तपासणी

आपले स्वास्थ; आपल्याच हातात – डॉ. पियुष सक्सेना

पुणे : कर्करोगाच्या जनजागृती कार्यक्रमांतर्गत काऊडिग्नीटी अँड फार्मर्स प्रोग्रेस फाउंडेशन या संस्थेच्या वतीने पुण्यात राबविण्यात आलेल्या “कॅन्सल द कॅन्सर” या तीन दिवशीय उपक्रमा ला भरघोस प्रतिसाद मिळाला. या मोफत कॅन्सर तपासणी शिबिरात एकूण २३५ नागरिकांनी तपासणी केली. या तपासणी साठी महालॅब्स आणि DKMS यांचे सहकार्य लाभले. तसेच ओम ब्लड बँकेच्या सहाय्याने रक्तदानात एकूण ३५ रक्त पिशव्यांचे संकलन झाले.

कर्करोग जनजागृतीसाठी आयोजित केलेल्या परिसंवादामध्ये मुंबईचे प्रसिद्ध डॉक्टर पियूश सक्सेना यांनी ‘क्लीजिंग थेरपी’ चा प्रयोग करून आपले आरोग्य कसे सुरक्षित ठेवू शकतो यावर मार्गदर्शन केले. तर सुरेश सपकाळ आणि हर्षदा टेमघरे यांनी ‘कॅन्सरने होणारा त्रास’ या विषयावर प्रकाश टाकला. या सत्राला काऊडिग्नीटी अँड फार्मर्स प्रोग्रेस फाउंडेशनचे अध्यक्ष सूर्या पुजारी, व्यवसाय मार्गदर्शन एस. एस. सावंत, श्वेता जाजु, बाल भाकरे, प्रणव थोरात उपस्थित होते.

‘क्लीजिंग थेरपी’ विषयी बोलताना डॉ. सक्सेना म्हणाले, आपण जगाला बदलू एवढी क्षमता आपल्यामध्ये नसली तरीही आपण स्वतःला नक्की बदलू शकतो. आपली प्रत्येक गोष्ट आपल्या हातात आहे. निरोगी जीवन पाहिजे असेल तर जास्त मेहनत करायची गरज नाही फक्त पण नैसर्गिक कृत्य करू नका. पूर्वी मनुष्य जंगलात राहायचा निसर्गाने जे दिल त्यातच उदरनिर्वाह करायचा त्यामुळे स्वस्थ राहात असे. जर आपण देखील नैसर्गिक गोष्टींचा उपयोग करायला लागलो तर आपलं स्वास्थ निरोगी राहिल्याशिवाय राहणार नाही.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading