२४ तास, राजकारणाने पछाडलेल्या फडणवीसांना, ‘सांस्कृतीक गौरवपर’ का बोलतां येईना..? काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी
पुणे : पुणे शहराचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी राज्याची सांस्कृतीक राजधानी, विद्येचे माहेरघर असलेल्या व पं भिमसेन जोशी गायन महोत्सव चोखंदळपणे राबवणाऱ्या ‘पुणे शहरात’ दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजवेयी यांचे नांवे घेतलेला, ‘संस्कृती प्रतिष्ठान’चा ‘पुरस्कार कार्यक्रम’ स्तुत्य व राजकारण विरहीत ‘सांस्कृतीक कार्यक्रम’ नुकताच पार पडला. या व्सासपिठावर पुरस्कार्थीं बद्दल गौरवपर, त्यांच्या निवडीवर प्रमुख पाहुणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बोलणे अपेक्षीत होते. ‘देशाचे_पंतप्रधान’ म्हणुन अटलजींच्या चांगल्या, संस्मरणीय व अराजकीय गुण-वैशीष्ठ्यांवर, अजात शत्रूत्वावर, त्यांचे लेखी असलेल्या विरोधकांच्या अस्तित्वावर, त्यांच्या ऐतिहासीक संसदीय भाषणांवर, त्यांच्या संविधानिक, लोकशाही प्रणीत व राजधर्म प्रेरीत गुण – वैशाष्ठ्यांवर, बोलणे देखील अपेक्षीत होते. अटलजींनी विरोघकांचा सदैव सन्मान केला.. त्यांचेवर कधीही कमरेखाली वार केले नाहीत वा सत्तेची आयुधे वापरून असंवैधानिक मार्गाने भ्रष्टाचाराशी सत्तेसाठी तडजोड ही केली नाही..! मात्र स्व अटलजींच्या सदगुणांचा मोदी-शहांच्या राजकारणाचा वारसा चालवणाऱ्या फडणवीसांना सोईस्कर विस्मरण झाल्याचेच पुणेकरांना पहायला मिळाले..
मात्र एका चांगल्या, दर्जेदार सांस्कृतीक कार्यक्रमाच्या व्यासपिठावर देखील (२४ तास राजकारणाने पछाडलेल्या) उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राजकीय गरळ ओकण्याचेच काम केले व ‘विरोधकांना राजकीय आव्हाने देत, राजकीय ऊखाळ्या पाखाळ्या काढत, मोदींच्या प्रशंसेचा अजेंडा राबवण्याचे काम करत, सांस्कृतीक पुण्यनगरीतील चांगल्या सांस्कृतीक कार्यक्रमाचा राजकीय आखाडा’ केला अशी टिका काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी फडणवीसांच्या विरोधकांना ऊद्देशुन केलेल्या भाषणावर केली.
तसेच, किराणा घराण्याच्या जेष्ठ गायीका डॅा प्रभा अत्रे आणि ऊद्योजक डॅा प्रमोद चौधरी या दोन्ही पुरस्कारार्थींचे अभिनंदन करत असल्याचे ही सांगितले. संस्कृती प्रतिष्ठान’च्या कार्यक्रमांत मा देवेंद्रजी किराणा घराण्याची गायकीची खासीयत, कला संस्कृती, डॅा प्रभा अत्रेजी यांचे विषयी अघिक बोलले असते तर त्यांची सांस्कृतीक उंची ही वाढली असती.
गोपाळदादा तिवारी पुढे म्हणाले की, ३७० कलमाचा डंका वाजवतांना, “आज ही सतत जम्मु – काश्मीर – पुंछ भागात.. ‘भारतीय जवान अतिरेकी हल्ल्यात मरत असल्याचे एका राज्याच्या गृह मंत्र्याच्या देखील निदर्शनास येत नाही काय’”.? असा संतप्त सवाल केला.
३७० हटवुन ७ वर्षे होऊन देखील, राष्ट्रपती राजवटीची एक हाथी सत्ता असुन देखील, तिथे अद्याप भाजपचे सरकार शांतता – सुरक्षा राबवू शकत नसेल, निवडणुका घेऊ शकत नसेल..(?) तरीही निर्लज्जपणे ३७० चा डंका कशाच्या आधारे पिटतां (?) असा सवाल ही काँग्रेसने केला.
एकीकडे पंतप्रधान अल्पसंख्यांकाच्या मतांसाठी, त्या समुदाया समोर “येशु ख्रिस्तांची मुल्ये सरकार साठी दीपस्तंभ” (?) असल्याचे सांगतात, तर त्यांचे शिष्य राम मंदीरा चा डंका वाजवतात हा विरोधाभास काय दर्शवतो..? असा सवाल केला.
मात्र
भाजप चे शीर्ष नेतृत्व असलेले #भाषणजीवी व #श्रेयजीवी दस्तूरखुद्द मोदी हे मात्र प्रभू “श्रीराम चरीत्रा”चे अनुकरण जीवनात व राजधर्माचे पालन करतांना प्रत्यक्ष किती करतात (?) हे भक्तगण सोईस्कर विसरतात व यावर बोलण्याची वेळ आली की धूम ठोकतात, अशी उपहासात्मक टिका देखील काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी फडणवीसांच्या राजकीय वक्तव्यांचा समाचार घेतांना केली.
