Wednesday, June 10, 2026
Latest NewsSports

महाराष्ट्र संघ, चैन्नई संघ, दिल्ली संघ, केरळ संघांनी उद्धघाटनाचा दिवस गाजवला !!

पुणे :  नेशन वाईड लॉयर्स क्रिकेट संघटना आणि पुणे बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २६ व्या वकीलांच्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघ, चैन्नई संघ, दिल्ली संघ आणि केरळ संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेचा उद्धघाटनाचा दिवस गाजवला.

स्पर्धेचे सामने पुण्यातील डेक्कन जिमखाना क्लब, शिंदे हायस्कूल मैदान-सहकारनगर, मोशी येथील हजारे स्पोर्ट्स क्लब आणि चिंचवड येथील व्हेरॉक दिलीप वेंसरकर क्रिकेट अ‍ॅकॅडमी या मैदानांवर आजपासून सुरू झाले. असद शेख याच्या अष्टपैलू खेळीमुळे महाराष्ट्र हायकोर्ट संघाने कर्नाटक हायकोर्ट संघाचा ५ गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना कर्नाटक संघाने १५० धावांचे आव्हान उभे केले. असद शेख याने ४ गडी तर, विवेक देशमुख याने २ गडी बाद केले. हे आव्हान महाराष्ट्र संघाने १६.४ षटकात व ५ गडी गमावून पूर्ण केले. संघाला विजय मिळवून देताना विवेक देशमुख याने नाबाद ५९ धावांची तर, असद शेख याने ३० धावांची खेळी केली. राजेंद्र मिसाळ (२६ धावा) आणि जीवन जाधव याने नाबाद २१ धावांचे योगदान देत संघाचा विजय साकार केला.

सुगूमार के. याच्या कामगिरीच्या जोरावर चैन्नई संघान अलाहाबाद संघाचा २ गडी राखून पराभव केला. सट्टी सिंग याच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर दिल्ली संघाने तेलंर्गीा संघाचा १४ धावांनी पराभव केला. अहाद टी. याच्या गोलंदाजीच्या जोरावर केरळ संघाने पाँडेचरी संघाचा ३७ धावांनी पराभव करून विजयी सलामी दिली.

स्पर्धेचे उद्धघाटन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश उज्जल भुय्या यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश श्री गडकरी, न्यायाधीश श्री. मोडक, आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश के. विजय, अ‍ॅड. राजेंद्र उमाप, स्पर्धेचे संचालक अ‍ॅड. उमेश चांडोले, अ‍ॅड. गुरू काळोखे आणि अ‍ॅड. विवेक देशमुख आदि मान्यवर व सहभागी संघांतील खेळाडू उपस्थित होते.

गटसाखळी फेरीः
कर्नाटक संघः २० षटकात ९ गडी बाद १५० धावा (करानिह एस. ३१, विनय वाय. २२, जयना पी. २१, असद शेख ४-१७, विवेक देशमुख २-३०) पराभूत वि. महाराष्ट्र संघः १६.४ षटकात ५ गडी बाद १५४ धावा (असद शेख ३० (१६, ४ चौकार, १ षटकार), विवेक देशमुख नाबाद ५९ (३७, ५ चौकार, २ षटकार), राजेंद्र मिसाळ २६, जीवन जाधव नाबाद २१, अनदा सी. २-२७); सामनावीरः असद शेख;

अलाहाबाद संघः १७.४ षटकात १० गडी बाद ७५ धावा (मोहीत चौहान २०, निलेश पी. नाबाद २३, सुगूमार के. ५-१५, हरी महेश २-१) पराभूत वि. चैन्नई संघः १८.३ षटकात ८ गडी बाद ७६ धावा (बी. प्रसाद २२, मुकेश सिंग ४-१२, हर्ष दिवेदी २-७); सामनावीरः सुगूमार के.;

दिल्ली संघः २० षटकात ८ गडी बाद १६९ धावा (प्रदीप यादव २८, यशवीर कुमार नाबाद ३०, वरूण कुमार ३०, मनोज सी. ३-२८, राजगोपाल रेड्डी २-२४) वि.वि. तेलंगणा संघः २० षटकात ६ गडी बाद १५५ धावा (सुमन गौड ३२, राहूल तापडीया नाबाद २५, संचित बंग ४४, खालीद सय्यद २८, सट्टी सिंग ३-१७); सामनावीरः सट्टी सिंग;

केरळ संघः २० षटकात ८ गडी बाद १४४ धावा (नवीन सिंग ४५, झायेद सय्यद २४, अहान टी. १९, कनगा राज २-१६) वि.वि. पाँडेचरी संघः १८.१ षटकात १० गडी बाद १०७ धावा (जना राजू ४०, वीरा मुथी २५, श्रयेस सी. ४-१५, अहाद टी. ३-६); सामनावीरः अहाद टी.;

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading