Saturday, June 13, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

Corona Update : राज्यात कोरोना JN1 व्हेरियंटच्या रुग्ण संख्येत वाढ

मुंबई : देशासह राज्यातही  कोरोनाच्या JN1 या व्हेरियंटच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. देशात मागील 24 तासांत कोरोनाचे 628 नवे रुग्ण आढळून आलेत. तर आज (25 डिसेंबर) रोजी राज्यात नव्या 25 रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत राज्यात JN1 व्हेरियंटचे 10 सक्रिय रुग्ण आढळून आलेत तर 13 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

गेल्या काही आठवड्यांपासून भारतात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. JN.1 या कोरोनाच्या नवीन सब-व्हेरियंटने भारताचीच नाही तर जगाची चिंता वाढवली आहे. कोरोना विषाणूच्या नव्या JN.1 प्रकाराबाबत सरकारने धोक्याचा इशारा दिलाय. तसेच खबरदारी घेण्यास सांगितले आहे.

गोव्यात JN.1 चे सर्वाधिक रुग्ण

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, देशात मागील 24 तासांत कोरोनाचे 628 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी सर्वाधिक पॉसिटीव्ह रुग्ण हे गोव्यात आढळून आले आहेत. आतापर्यंत गोव्यामध्ये  JN.1 चे 34 नवे रुग्ण सापडले आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात 10  कर्नाटकात आठ, केरळमध्ये सहा, तामिळनाडूमध्ये चार आणि तेलंगणामध्ये दोन रुग्ण आढळून आले आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading