सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संत गाडगे महाराजांना पुण्यतीथी निमित्त अभिवादन
पुणे – अंधश्रद्धेने बरबटलेल्या समाजाचे लोकशिक्षण व प्रबोधन करणाऱ्या, समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना स्वच्छता आणि चारित्र्य याची शिकवण देणाऱ्या संत गाडगे महाराजांची आज पुण्यतिथी. त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्त सावित्रीबाई फुले विद्यापीठीत त्यांना अभिवादन करण्यात आले. विद्यापीठाच्या सरस्वती सभागृहात विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे, वित्त व लेखा अधिकारी चारुशिला गायके, अधिसभा सदस्य डॉ. राजेंद्र घोडे, जयकर ज्ञानस्त्रोत केंद्राच्या संचालक डॉ. अपर्णा राजेद्र, अर्थशास्त्राचे विभागप्रमुख डॉ. विलास आढाव, सहायक कुलसचिव डॉ. अजय ठुबे यांनी संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
