बिग बॉस 17 मध्ये प्रेक्षकांनी अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांना केला सपोर्ट
बिग बॉस 17 मध्ये रोज नवनवीन गोष्टी घडताना दिसतात आणि आता हा खेळ अनोख्या आणि आश्चर्यकारक वळणार येऊन पोचला असताना या घरातलं चर्चेत असलेले एक जोडपे म्हणजे अंकिता आणि विकी नुकतच सोशल मीडिया वर त्यांच्या मधल्या त्रुटी दाखवणारी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि यावर अनेक आरोप प्रत्यारोप देखील झाले पण दर्शकांनी अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांना दमदार पाठींबा दाखवला आहे. नील-ऐश्वर्याच्या डिजिटल टीमने अंकिता आणि विकीची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केल्यावर या जोडप्याच्या समर्पित चाहता वर्गाकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया निर्माण झाल्यामुळे हा वाद टोकाला गेला आहे.
वादाचा मुख्य मुद्दा नील आणि ऐश्वर्याच्या अकाऊंटवर शेअर केलेल्या तुलनात्मक व्हिडिओभोवती चर्चा झाल्या आणि त्यासोबत अंकिता आणि विकीच्या नातेसंबंधातील दोषांवर प्रकाश टाकणारी एक प्रेस नोट देखील बाहेर आली. प्रेक्षकांनी त्यांचा असंतोष व्यक्त केला असून नील आणि ऐश्वर्याच्या टीमने त्यांची स्वतःची सार्वजनिक प्रतिमा चांगली करण्यासाठी या जोडप्याचे चुकीचे चित्रण केल्याचा आरोप केला आहे.
“विकी अंकिताच्या नात्याबद्दल बोलण्याचा अधिकार तुला कोणी दिला? जर तुम्ही नीलची तुलना विक्कीसोबत केली असेल तर तुम्ही ऐश्वर्या आणि अंकिता यांच्या वर्तनाची तुलना केली असेल. तुम्ही सेलिब्रिटी आहात दुसऱ्याच्या नात्यात ढवळाढवळ करू नका”
“किती असंवेदनशील आहात ! अंकिता आणि विकी यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे ” नील आणि ऐश्वर्याचा PR.
लोकांचे म्हणणे आहे की त्यांच्या नातेसंबंधाला कमकुवत करण्याच्या प्रयत्नामुळे अंकिता आणि विकीबद्दल प्रेक्षकांना या दोघा बद्दल आदर निर्माण झाला आहे.
