Monday, August 31, 2026
Latest NewsPUNE

विद्यापिठाने साजरी केली ‘ज्ञान सरिता ग्रंथ दिंडी’

 

पुणे : “वाचाल तर वाचाल” या उक्ती प्रमानेच वाचनाचे महत्व आणि वाचनाचे संबोधन करण्याच्या हेतूने ‘ज्ञान सरिता ग्रंथ दिंडी’ चे आयोजन करण्यात आले. या ‘ज्ञान सरिता ग्रंथ दिंडी’ चा विषय डॉ. बाबसाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधान असुन या दिंडी ची सुरवात पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारती पासुन झाली. सदर दिंडी करीता मा. कुलगुरु, डॉ. सुरेश गोसावी, प्र. कुलगुरु डॉ. पराग काळकर आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक, डॉ. सदानंद भोसले हे उपस्थित होते.

मा. कुलगुरु, डॉ. सुरेश गोसावी, प्र. कुलगुरु डॉ. पराग काळकर यांनी दिंडी मधील सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून दिंडी साठी शुभेच्या दिल्या व डॉ. सदानंद भोसले यांनी उपस्थितांचे आभार मानले. दिंडी विद्यापीठ परिसरातून जात असताना विविध घोषणा देण्यात आल्या आणि डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला विनम्र अभिवादन करून दिंडी आबासाहेब गरवारे महाविद्यालया कडे पायी मार्गस्त झाली. ‘ज्ञान सरिता ग्रंथ दिंडी’ दुपारी गरवारे महाविद्यालय परिसरात पोहचली व महाविद्यालय मधे दुपारी भोजन करून पायी दिंडी फर्ग्यूसन महाविद्यालया कडे मार्गस्त झाली. या दिंडीमध्ये विद्यापिठातील ७० विद्यार्थी, कर्मचारी सहभागी झाले होते. दिंडी मधून भारतीय संविधानाचे महत्व आणि वाचन संस्कृती चे जतन करण्याचा संदेश देण्यात आला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading