Monday, August 31, 2026
ENTERTAINMENTLatest News

बॉलिवूडलाही पडली ‘पंचक’ची भुरळ

डॉ. श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित यांची निर्मिती असलेला ‘पंचक’ चित्रपट येत्या नवीन वर्षात म्हणजेच ५ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या ट्रेलरला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. सिनेप्रेमी ‘पंचक’च्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहात आहेत. प्रेक्षकांच्या ट्रेलर पसंतीस उतरत असतानाच या चित्रपटाची भुरळ बॉलिवूडच्या कलाकारांनाही पडली आहे. सध्या बॉलिवूड सेलिब्रिटी सोशल मीडियावरून डॉ. श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. यात काजोल,शिल्पा शेट्टी, रितेश देशमुख, करण जोहर, संजय कपूर अशा अनेक नामवंतांनी आपल्या सोशल मीडियावरून ट्रेलरचे भरभरून कौतुक केले आहे.

जयंत जठार आणि राहुल आवटे दिग्दर्शित या चित्रपटात आदिनाथ कोठारे, दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर, आनंद इंगळे, तेजश्री प्रधान, सतीश आळेकर, नंदिता पाटकर, सागर तळाशीकर, संपदा कुलकर्णी, आशिष कुलकर्णी, दिप्ती देवी, विद्याधर जोशी, आरती वडगबाळकर, गणेश मयेकर अशी तगडी स्टारकास्ट आहे. राहुल आवटे लिखित ‘पंचक’चे नितीन प्रकाश वैद्य कार्यकारी निर्माते आहेत.

प्रेक्षकांकडून, इंडस्ट्रीतील सह कलाकारांकडून मिळणाऱ्या शुभेच्छांबद्दल माधुरी दीक्षित नेने म्हणतात, ” खूप छान वाटतेय, प्रेक्षकांना, इंडस्ट्रीतील माझ्या मित्र परिवाराला ‘पंचक’चा ट्रेलर आवडला. सगळ्यांचे मनापासून आभार. तुमचे प्रेम आमच्या टीमवर सदैव असेच असुदे. मला खात्री आहे माझा इंडस्ट्रीतील परिवार हा चित्रपट नक्की बघणार. प्रेक्षकांनाही ‘पंचक’ खूप आवडेल.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading