फायसर्व्ह तर्फे लोहगाव येथील संत तुकाराम विद्यालयामध्ये पहिल्या स्टेम लॅबोरेटरीचे उदघाटन
पुणे : आर्थिक सेवा टेक्नॉलॉजी सोल्यूशन्स आणि पेमेंट्स मध्ये जागतिक पातळीवर आघाडीवर असलेल्या फायसर्व्ह या कंपनीने पुणे आणि पुण्याच्या आसपास आठ सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना अनुभवात्मक शिक्षण प्रदान करण्यासाठी आपल्या सायन्स टेक्नॉलॉजी इंजीनीअरिंग आणि मॅथेमेटिक्स (स्टेम STEM) प्रयोगशाळा उपक्रमाचे उद्घाटन केले. सदरील उपक्रमास महाराष्ट्र राज्य शैक्षणिक खात्याचे समर्थन आहे. हा उपक्रम फायसर्व्हच्या कॉर्पोरेट सोशल रेस्पॉन्सिबिलिटी पार्टनर युनिटेड वे, मुंबई मार्फत राबविण्यात येत आहे.
६९ लक्ष रु पेक्षा जास्त गुंतवणुकीसह, प्राथमिक आणि माध्यमिक वर्गांमधील ४००० पेक्षा जास्त वंचित विद्यार्थ्यांना स्टेम शिक्षणाचे लाभ देण्याचा फायसर्व्हचा इरादा आहे. या उपक्रमाचा फोकस किफायतशीर, अभ्यासक्रमावर आधारित स्टेम लॅबोरेटरीजची रचना आणि विकास यावर आणि त्याद्वारे संकल्पनेची कल्पना करणे, शोध प्रक्रिया, प्रयोगशीलता आणि शिकण्या-शिकवण्याच्या संपूर्ण नावीन्यपूर्ण पद्धती दाखल करण्यावर आहे. या लॅबोरेटरीच्या मदतीसाठी पहिल्या वर्षासाठी ई-लर्निंग इन्फॉर्मेशन आणि कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी (ICT) मोबाइल अँप्लिकेशन ‘ट्यूटर सपोर्ट’ असेल तसेच क्वालिटी कंट्रोलसाठी प्रोग्राम मॅनेजमेंट वजा इंपॅक्ट असेसमेंट टूल असेल.
हा उपक्रम फायसर्व्ह गिव्ह्ज बॅक हा या कंपनीचा ग्लोबल कॉर्पोरेट सोशल रेस्पॉन्सिबिलिटी प्रोग्राम आहे, ज्याचा उद्देश आपण ज्या समुदायात राहतो आणि काम करतो, त्या समुदायांसाठी चार महत्त्वाच्या क्षेत्रांत एक सकारात्मक अनुभव तयार करणे हा आहे. ही चार मुख्य फोकस क्षेत्रे आहेत – शिक्षणाचा प्रचार, पर्यावरणीय व्यवस्थापन, समावेशकता आणि आरोग्य व कल्याण. या उपक्रमात पुण्यातील श्री संत तुकाराम विद्यालय, शिवराज विद्या मंदिर वडगांव शेरी, श्री संत तुकाराम माध्यमिक विद्यालय, चंदन नगर, कृष्णाजी खंडूजी घुले विद्यालय, बालसिद्धनाथ विद्यालय, बेलसर, पुरंदर, यशवंत विद्यालय मावडी के. पी. भागशाळा, पांडेश्वर, पुरंदर, मावडी पिंपरी हायस्कूल, पिंपरी, पुरंदर, शंकरराव कोलते विद्यालय, पिसर्वे, पुरंदर ह्या शाळा समाविष्ट आहेत.
फायसर्व्हचे ग्लोबल सर्व्हिसेस, अध्यक्ष, श्रीनी क्रिश म्हणाले की , “आपण जेथे राहतो आणि काम करतो, तेथे आपल्या समुदायांना सशक्त बनवणे हे सर्वसमावेशक विकासासाठी अटळ आहे. देशभरात स्टेम शिक्षणाचा प्रचार करण्याच्या आमच्या उपक्रमाद्वारे आम्ही वंचित शाळांमधील तरुण मुलांपर्यंत प्रायोगिक शिक्षण पोहोचवू शकू अशी आम्हाला आशा वाटते. राष्ट्रीय टॅलेंट पूलच्या पायाभरणीसाठी हे आमचे योगदान आहे आणि आम्ही शक्य तितक्या चांगल्या प्रकारे समाजाची परतफेड करत राहू.”
चेन्नई, बंगळूर आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (NCR) येथील सरकारी शाळांमध्ये या प्रकल्पाची सुरुवात केल्यानंतर फायसर्व्ह आता पुण्यातील ८ सरकारी शाळांमध्ये हा उपक्रम राबवत यशस्वीरित्या आपला विस्तार वाढवत आहे.
