Sunday, June 14, 2026
Latest NewsPUNE

ऑल युनियन ऍंड असोसिएशन ऑफ बी.एस.एन.एल.च्या वतीने पी.जी.एम.टी. ऑफिस, सातारा रोड येथे निदर्शने

पुणे : PGMT ऑफिस सातारा रोड या ठिकाणी एक भव्य निदर्शनाचा कार्यक्रम डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉम (DOT) याच्या विरोधामध्ये बीएसएनएल मधील सर्व युनियन आणि असोसिएशन च्या वतीने निदर्शने करण्यात आली.
सन 2000 सालि जेव्हा BSNL चा जन्म झाला होता तेव्हा भारत सरकार च्या कॅबिनेटमध्ये एकमताने एक ठराव मंजूर करण्यात आला आणि त्या कॅबिनेटचे डिसिजन अनुसार डीटीओची जागा ALTTC ट्रेनिंग सेंटर गाजियाबाद ही इमारत आणि जागा BSNL ला देण्यात आली, पण अचानक 10 नोव्हेंबर 2023 रोजी DOT नीं एक आदेश काढून ही ALTTC गाजियाबाद ची बिल्डिंग आणि संपूर्ण जागा आपल्या ताब्यामध्ये घेतली.

या ALTTC गाजियाबाद मध्ये बीएसएनएल चा भारतातलं सगळ्यात मोठा ऍडव्हान्स ट्रेनिंग सेंटर आहे. या ठिकाणी संपूर्ण BSNL कर्मचारी व अधिकारी यांना ऍडव्हान्स ट्रेनिंग दिली जाते, बीएसएनएल हा सतत टेक्नॉलॉजी मध्ये बदलत राहणारा खात आहे त्यामुळे त्यांचे कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना सतत नवीन नवीन टेक्नॉलॉजी च्या ट्रेनिंगची आवश्यकता असते. हा ट्रेनिंग सेंटर DOT नी परत घेतल्याने बीएसएनएलची कर्मचारी व अधिकाऱ्यांचं ट्रेनिंग घेण्याचं मोठा प्रॉब्लेम निर्माण होणार आहे आणि दुसरी गोष्ट की हा 2000 साली युनियन कॅबिनेट नी घेतलेले निर्णयाचा अवमान व उल्लंघन आहे म्हणून आमची मागणी आहे DOT नी
10/11/2023 रोजी काढलेला आदेश माघार घ्यावं, अन्यथा सर्व बीएसएनएल च्या कर्मचाऱ्यांना पुन्हा DOT मध्ये सामील करून घ्यावे.

या आंदोलनात 150 पेक्षा जास्त कर्मचारी उपस्थित होते. यावेळी युसुफ जकाती, सुनील सोनवने, विजय नारायणकर, आनंद मुडविकर, संदीप गुळूंजकर यांनी मार्गदर्शन केले व विकास कदम यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. अरुण राऊत, दत्ता चव्हाण, विद्याधर सोनवणे, अमर जोशी, प्रकाश उक्के, राजगुरू मॅडम, आकाश उपासनी, गणेश भोज, सुनील गावडे, नितीन कदम, विजया सांगळे, कैलास काटे, आंबा निगडे, सरदेशमुख, काळे यांनी प्रयत्न केला

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading