Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

पादचारी दिन  निमित्त सोमवारी लक्ष्मी रोडवरून धावणाऱ्या  पीएमपी बसेसच्या मार्गांत बदल

पुणे : पुणे महानगर पालिकेमार्फत दिनांक ११/१२/२०२३ रोजी पादचारी दिनानिमित्त लक्ष्मी रोडवर (उंबऱ्या गणपती चौक ते गरूड गणपती चौक) वॉकिंग प्लाझा करण्यात येणार असल्याने लक्ष्मी रोडवरून संचलनात असलेल्या बसेसच्या मार्गात दिनांक ११/१२/२०२३ रोजी सकाळी १०.०० ते सायं. ०७.०० वाजेपर्यंत खालील प्रमाणे बदल करण्यात येत आहे.
१) बस मार्ग क्र. अटल पुण्यदशम ७ व ९ हे मार्ग बंद राहतील.
२) बस मार्ग क्र. ५५, ५८, ५९ हे बस मार्ग शनिपारकडे येताना कुमठेकर रोड मार्गे नियमित मार्गाने व शनिपारकडून जाताना अ.ब.चौक, नारायण पेठ, अलका टॉकिज चौकातुन पुढे नियमित मार्गाने संचलनात राहतील.
३) बस मार्ग क्र. ५७ या मार्गावरील बसेस पुणे स्टेशनकडुन जाताना बस मार्ग क्रं ९४ ने नारायणपेठ मार्गे अलका टॉकिज चौक व पुढे नियमित मार्गाने संचलनात राहतील.
४) बसमार्ग क्र. ८१, १४४, १४४ अ, १४४ क व २८३ या मार्गावरील बसेस पुणे स्टेशनकडे जाताना नियमित मार्गाने व पुणे स्टेशनकडून येताना मनपा मार्गे संचलनात राहतील.
५) बसमार्ग क्र. १७४ या मार्गावरील बसेस पुणे स्टेशनकडून एनडीए कडे जाताना सिटी पोस्ट पर्यंत नियमित मार्गाने व पुढे सिटी पोस्ट चौकातुन डावीकडे वळुन स्वारगेट, सारसबाग, टिळकरोड, डेक्कन कॉर्नर व पुढे नियमित मार्गाने एनडीए कडून पुणे स्टेशनकडे येताना सदर मार्गावरील बसेस नियमित मार्गाने संचलनात राहतील.
६) बस मार्ग क्र. १९७ व २०२ या मार्गावरील बसेस हडपसरकडून कोथरूड डेपो /वारजे माळवाडीकडे जाताना सिटी पोस्ट पर्यंत नियमित मार्गाने व पुढे सिटी पोस्ट चौकातुन डावीकडे वळुन स्वारगेट, सारसबाग, टिळकरोड, डेक्कन कॉर्नर व पुढे नियमित मार्गाने कोथरूड डेपो वारजे माळवाडीकडुन हडपसरकडे येताना सदर मार्गावरील बसेस नियमित मार्गाने संचलनात राहतील.
बसमार्ग क्र. ६८ या मार्गावरील बसेस अप्पर डेपो कडे जाताना नियमित मार्गाने व अप्पर डेपो कडून सुतारदरा कडे येताना टिळकरोड मार्गे संचलनात राहतील. सदर दिवशी वॉकिंग प्लाझा संपलेनंतर वरील सर्व मार्गावरील बसेस पुर्ववत मार्गाने संचलनात राहतील.
सदर कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरीकांच्या सोयीसाठी नगरकर तालीम चौक ( नु.म.वि. चौक)- बाजीराव रोड- मनपा- नगरकर तालीम चौक ( नु.म.वि. चौक) या मार्गावर ३० मि. वारंवारीतेने, स्वारगेट – उंबऱ्या गणपती चौक – स्वारगेट या मार्गावर ४० मि. वारंवारीतेने व डेक्कन – उंबऱ्या गणपती चौक – डेक्कन या मार्गावर ३० मि. वारंवारीतेने जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच शिवाजीनगर सिव्हील कोर्ट मेट्रो स्टेशन येथुन येणाऱ्या नागरीकांच्या सोयीसाठी बसमार्ग क्र. २ शिवाजीनगर रेल्वे स्टेशन ते स्वारगेट या मार्गावरील बसेस सिव्हील कोर्ट मेट्रो स्टेशन मार्गे ४ मि. वारंवारीतेने संचलनात ठेवण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading