Wednesday, November 18, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

भुजबळ कडाडले; मी जाईल तिथे गोमूत्र शिंपडता मग शूद्र होण्यासाठी उपोषणाला का बसता?

इंदापूर : “मी शूद्र म्हणून तुम्ही मी गेल्यावर रस्त्यावर गोमूत्र शिंपडलं. मग आमच्या सोबत बसण्यासाठी आमरण उपोषण कशाला करता? शूद्र होण्यासाठी तुम्ही कुणबी प्रमाणपत्र मागता का?, अशा शब्दांत आक्रमक भूमिका घेत ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी आज इंदापूर येथे जाहीर सभेत मनोज जरांगे यांना खडे बोल सुनावले. तसेच मराठ्यांना आरक्षण द्या पण ओबीसी मधून नको याचा पुनरुच्चार केला.

आधी सरकारमधील OBC च्या जागा भरा

मराठा समाजाची मत जास्त आहेत, असं सरकारला वाटतं म्हणून मनोज जरांगे यांच्यावर व मराठा आंदोलकांवर कारवाई होत नाही. परंतु मराठ्यांकडे 20 टक्के मतं आहेत तर आमच्याकडे 80 टक्के मतं आहेत. शिवाय आम्हला सरकारी नोकरीमध्ये २७ टक्के आरक्षण आहे. मात्र, तरी देखील सरकारमधील OBC च्या ९ टक्के जागा रिक्त आहेत. आधी सरकारने या जागा भराव्यात.

जनगणना करा 

सरकारमधील सर्व नेते म्हणतात की लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळाले पाहिजे. मग अजून पर्यंत जनगणना का झालेली नाही? आरक्षण जाहीर करण्यापूर्वी सरकारने जनगणना करावी, अशी मागणी देखील छगन भुजबळ यांनी यावेळी केली.

 

Leave a Reply