Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

पुणे जिल्हा संपर्क नेते संजय म्हशीलकर यांनी दगडूशेठ गणपतीची आरती करून पुणे लोकसभा पक्षबांधणीचा केला श्रीगणेशा

पुणे: शिवसेना पक्षाचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने पुणे जिल्हा संपर्क नेते पदी निवड झाल्या नंतर पहिल्यांदाच पुणे शहरात येऊन माननीय संजय म्हशीलकर सचिव शिवसेना यांनी दगडूशेठ गणपतीची आरती करून पुणे लोकसभा पक्षबांधणीचा श्रीगणेशा केला.

पुणे सोलापूर संपर्क नेते पश्चिम महाराष्ट्र पदी शिवसेना सचिव संजय मशिलकर पुणे लोकसभा निवडणुकीच्या संघटन बैठकीच्या निमित्ताने पुणे दौऱ्यावर आज आले होते. संजय मशिलकर यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात श्रींची आरती करून महानैवेद्य चाडवला.

सदर महाआरतीचे आयोजन अजय बापू भोसले (सहसंपर्क प्रमुख पुणे जिल्हा), धनंजय जाधव (पुणे शहर समन्वय), निलेश धुमाळ (विभाग प्रमुख कसबा) यांनी केले होते. प्रसंगी प्रमुख पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading