सोनिया गांधी यांना उदंड तसेच निरोगी आयुष्य लाभण्यासाठी उद्या दगडूशेठ गणपतीला महाआरती
पुणे: आदरणीय नेत्या, काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्षा, खासदार सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उदंड आयुष्य आणि आरोग्य लाभावे याकरिता उद्या, शनिवार, दि. ९ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता माजी महसूलमंत्री मा.बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते दगडूशेठ गणपतीला महाअभिषेक आणि महाआरती करण्यात येणार आहे, असे काँग्रेसच्या सेवा, त्याग आणि कर्तव्य सप्ताहाचे संयोजक, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी कळविले आहे.
आदरणीय नेत्या सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित सेवा, त्याग आणि कर्तव्य सप्ताह दि. २ ते १० डिसेंबरपर्यंत विविध उपक्रमांद्वारे साजरा केला जात आहे. यामध्ये ७५ महिला सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षा कीट वाटप, फर्ग्यूसन रस्त्यावरील सुदर्शन हॉल येथे रक्तदान शिबीर, महापालिकेच्या गोखलेनगर येथील शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि खाऊ वाटप, पुणे कॅन्टोन्मेंटच्या सरदार वल्लभभाई पटेल हॉस्पिटलमध्ये रुग्णांना फळे आणि बिस्किटे वाटप, कॉर्टर गेट येथील महिला वृद्धाश्रमात फळे वाटप असे कार्यक्रम दिनांक ९ रोजी होणार आहेत, अशी माहिती मोहन जोशी यांनी दिली.
वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला (आज) शुक्रवारी रात्री पदपथावर झोपणाऱ्या ५०० निराधारांना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले.
