Monday, June 15, 2026
Latest NewsSports

आर्यन्स,  डार्क संघाचा दमदार विजय

पुणे : डार्क क्रिकेट अकादमी संघाने वॉरीयर्स संघाला तर आर्यन्स संघाने वॉव संघाला पराभूत करताना आबेदा इनामदार निमंत्रित महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेतील आपली आगेकूच कायम राखली.

आझम स्पोर्ट्स अकादमीच्या मैदानावर झालेल्या आजच्या लढतीमध्ये डार्क क्रिकेट अकादमी संघाने वॉरीयर्स क्रिकेट संघाला पराभूत केले. वॉरीयर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ८ बाद १०७ धावा केल्या. यामध्ये अदिती वाघमारेने २५ (२३ चेंडू, ३ चौकार), निधी शांभवानीने १९ (१९ चेंडू, २ चौकार), परिणीता पाटील १९ (२० चेंडू, २ चौकार) यांनी संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. वॉरीयर्स संघाकडून वेदिका दळवी व क्रीशी ठक्कर यांनी प्रत्येकी २ तर इशा घुले व सहेज कौर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

डार्क अकादमी संघाने १७.१ षटकांत २ बाद १०८ धावा करताना विजय साकारला. डार्क संघाकडून सलामीवीर क्रीशी ठक्करने ५३ चेंडूत नाबाद ५५ धावांची (७ चौकार, १ षटकार) खेळी करताना संघाला एकहाती विजय मिळवून दिला. तिला इशा घुलेने ३३ (२८ चेंडू, ५ चौकार) तर श्वेता जाधवने १३ (१७ चेंडू, २ चौकार) धावा क्रीशीला सुरेख साथ दिली. उत्कर्षा कदम व मधुरा इंगवले यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.

आर्यन्स संघाने वॉव अकादमी संघाला ४२ धावांनी  पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना आर्यन्स संघाने निर्धारित १६ षटकांत ३ बाद १२९ धावा केल्या. भक्ती पवारने नाबाद ५५ (४७ चेंडू, ६ चौकार, १ षटकार) तर श्रावणी जामदारने ४६ (३८ चेंडू, ५ चौकार) धावा करताना संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. कार्तिकी आणि साक्षी पानसरे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. वॉव क्रीकेट अकादमी संघाने निर्धारित १६ षटकांत २ बाद ८७ धावा केल्या. साक्षी पानसरेने नाबाद ३८ (५६ चेंडू , २ चौकार), सिद्धी राणेने नाबाद २९ (३३ चेंडू, ३ चौकार) धावा केल्या. मात्र, त्या संघाला पराभवापासून वाचवू शकल्या नाहीत. मन्सा कपूर व स्नेहा शिंदेने प्रत्येकी १ गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक :

वॉरीयर्स क्रिकेट : २० षटकांत ८ बाद १०७ : अदिती वाघमारे २५ (२३ चेंडू, ३ चौकार), निधी शांभवानीने १९ (१९ चेंडू, २ चौकार), परिणीता पाटील १९ (२० चेंडू, २ चौकार), वेदिका दळवी ४-०-१५-२, क्रीशी ठक्कर ४-०-२८-२, इशा घुले ४-०-२१-१, सहेज कौर ३-०-११-१ पराभूत विरुद्ध  डार्क अकादमी :  १७.१ षटकांत २ बाद १०८ : क्रीशी ठक्कर नाबाद ५५ (५३ चेंडू, ७ चौकार, १ षटकार), इशा घुले ३३ (२८ चेंडू, ५ चौकार), श्वेता जाधव १३ (१७ चेंडू, २ चौकार), उत्कर्षा कदम ३.१-०-१८-१, मधुरा इंगवले ३-०-२०-१.

आर्यन्स : १६ षटकांत ३ बाद १२९ : भक्ती पवार नाबाद ५५ (४७ चेंडू, ६ चौकार, १ षटकार), श्रावणी जामदार ४६ (३८ चेंडू, ५ चौकार), साक्षी पानसरे २-०-१९-१, कार्तिकी ३-०-२४-१ विजयी विरुद्ध वॉव क्रिकेट अकादमी :  १६ षटकांत २ बाद ८७ : साक्षी पानसरे नाबाद ३८ (५६ चेंडू , २ चौकार),  सिद्धी राणे नाबाद २९ (३३ चेंडू, ३ चौकार), मन्सा कपूर २-०-८-१, स्नेहा शिंदे २-०-९-१

——

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading