Monday, August 31, 2026
ENTERTAINMENTLatest News

मराठी चित्रपटसृष्टीला मिळाला नवा चेहरा – यशश्री व्यंकटेश

 

मराठी चित्रपटसृष्टीत नवनवीन दर्जेदार चित्रपटांची निर्मिती होत आहे.  अशा दर्जेदार चित्रपटांतून दर्जेदार कलाकार ही मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत.
आगामी प्रसिद्ध होणाऱ्या “क्लब ५२”  चित्रपटातून यशश्री व्यंकटेश ही मराठी चित्रपटसृष्टीत दणक्यात पदार्पण करत असून यशश्रीच्या रूपाने मराठी चित्रपट सृष्टीतीला एक ग्लॅमर चेहरा तसेच नवीन चेहरा मिळाला आहे. यशश्री क्लब ५२ चित्रपटात मुख्य नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. प्रसिद्ध अभिनेता हार्दिक जोशी सोबत ती रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.

करिअरच्या सुरवातीला दिग्गज कलाकारांसोबत काम करताना थोडस दडपण होते. मात्र यशश्रीचे वडील व्यंकटेश उर्फ ​​बजरंग बादशाह हे एक प्रसिद्ध अभिनेते आहेत. घरातूनच अभिनयाचे बाळकडू मिळाल्याने ते दडपण ही तिचे नाहीसे झाले. याच बरोबर तिच्या हातात मराठी आणि हिंदीतील मोठे चित्रपट आहेत. या चित्रपट तिने मुख्य भूमिकेशिवाय दोन गाणी देखील आदर्श शिंदे सोबत गायली आहेत. नभ बरसे रे आणि गुडनाईट असे गाण्याचे बोल आहेत.

यशश्री ही एक उत्तम गायिका तसेच नृत्यांगना आहे. तिने बहुचर्चित ड्रीम गर्ल सारख्या चित्रपटांमध्ये मित ब्रोस सोबत संगीत सहाय्यक म्हणून काम केले आहे.  तिने किया किया २.० नाना पाटेकर आणि अनिल कपूर अभिनीत वेलकम मधील किया कियाचा रिमेक गाणे देखील गायले आहे. हा चित्रपट बजरंग बादशाह यांनी लिहिला असून संगीत करण आणि दर्शन दासरी यांचे आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading