Crime News : युवकाच्या आत्महत्येप्रकरणी अल्पवयीन मुली विरुद्ध गुन्हा दाखल
पुणे – प्रेयसी दुसऱ्या मुलाबरोबर फिरत असल्याच्या नैराश्यातून सोळा वर्षे अल्पवयीन युवकाने आजीच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना येरवडा येथील लक्ष्मी नगर मध्ये घडली. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात त्याच्या अल्पवयीन प्रेयसी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जीवन राजू कसबे (वय १६) असे आत्महत्या केलेल्याचे युवकाचे नाव आहे. याप्रकरणी लक्ष्मीनगर येथे राहणाऱ्या सोळा वर्षीय अल्पवयीन मुली विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी जीवनची आई लक्ष्मी राजू कसबे (वय ३७) यांनी फिर्याद दिली आहे. जीवन आणि सदर मुलीमध्ये तीन वर्षांपासून प्रेम संबंध होते. मात्र, मागील काही दिवसांपासून या मुलीचे आणि जीवनचे बिनसले होते. ती त्याच्याशी नीट बोलत नव्हती. जीवन याला तिची इतर कोणत्यातरी मुलासोबत जवळीक वाढल्याचा संशय होता. त्यामधून त्याला मानसिक तणाव जाणवत होता. याच मानसिक त्रासातून त्याने त्याच्या आजीच्या घरी लक्ष्मीनगर येथे जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी अल्पवयीन प्रेयसी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जमदाडे करीत आहे.
