Monday, August 31, 2026
Latest NewsPUNE

सशस्त्र सेना ध्वज दिनी जाधवर इन्स्टिट्यूटतर्फे अनोखी मानवंदना

पुणे : भारत माता की जय च्या जयघोषात भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी साज-या करण्यात येणा-या सशस्त्र सेना ध्वज दिनी अनोखी मानवंदना देण्यात आली. भारताचा राष्ट्रध्वज तसेच लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या ध्वजांची भव्य प्रतिकृती न-हे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूट तर्फे साकारण्यात आली.

संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. शार्दुल जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली ३०० हून अधिक विद्यार्थ्यांनी उपक्रमात सहभाग घेतला. भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन भारतात दरवर्षी ७ डिसेंबर रोजी साजरा केला जातो. देशाच्या सीमांचे रक्षण तीन सैन्य करतात. भारतीय लष्कर ध्वज दिन प्रत्यक्षात लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी साजरा केला जातो.

अ‍ॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, सशस्त्र सेना ध्वज दिवस हा भारतीय सशस्त्र दलातील जवानांच्या कल्याणासाठी भारतातील लोकांकडून निधी गोळा करण्यासाठी समर्पित करण्यात आलेला दिवस आहे. हा दिवस भारताच्या प्रत्येक सैनिकाचा आणि देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीदांचा सन्मान करण्याचा दिवस आहे. त्यामुळे यादिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी सैनिकांना अनोखी मानवंदना दिली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading