Monday, August 31, 2026
ENTERTAINMENTLatest News

बाळुमामाच्या नावानं चांगभलं मालिकेत नवीन एंट्री..


सुरेखा कुडची साकारणार अक्काची भूमिका

कलर्स मराठीवरील बाळुमामाच्या नावानं चांगभलं या लोकप्रिय मालिकेत एका नवीन चेहऱ्याची एंट्री पाहायला मिळणार आहे. अक्का ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या मालिकेत बाळूमामांच्या मेंढ्या आजारी आहेत. औषधोपचार करून ही काही मेंढ्या मारतात, आजार वाढत चालला आहे. त्यात तात्या आणि त्यांची बायको मामांना अक्काकडून उतारा करून घेण्यास सांगतात पण सेवकांना प्रश्न पडतो, ही अक्का आहे तरी कोण? अक्का मामांपेक्षा मोठी आहे का? अक्का ही एक देवीची भक्त आहे. अंगावर सोनं मढवलेलं, उंची साड्या,.घरात देवीचं ठानं मांडलेलं..गावातली लोकं तिला घाबरून असतात,गावकऱ्यांना कोणता ही त्रास असला कि अक्काकडे उतारा करायचा नाही तर संकट नाही टळणार, गावात असं वातावरण असतांना बाळूमामांच्या मेंढयांवर संकट आलं असून आता मामा स्वतः अक्का कडे जातील का? अक्का आणि मामा यांचा होणार का सामना? हे पाहण्यासाठी पाहा, बाळुमामाच्या नावानं चांगभलं, सोम-शनि, संध्या ७.३० वा . कलर्स मराठीवर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading