Tuesday, September 1, 2026
Latest NewsPUNE

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एका समाजाचे नाही तर बहुजनांचे पुढारी – अरविंद शिंदे

पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्याज महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास शहराध्यक्ष अरविंद शिंदे व पदाधिकारी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर काँग्रेस भवन येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ एका समाजासाठी नव्हे तर संपूर्ण बहुजन समाजातील दलित, पीडित, शोषित, शेतकरी यांच्यासाठी अथक परिश्रम घेऊन त्यांना नावारूपाला आणले आहे. त्यांच महिलांसाठीच योगदान फार मोठा आहे त्यांनी महिलांसाठी सुद्धा अनेक चांगले निर्णय त्या काळात घेतले आहेत. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका जातीचे पुढारी नसून ते बहुजन समाजाचे पुढारी होते. त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतो.’’
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड. अभय छाजेड म्हणाले की, ‘‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील दलित समाजाच्या उद्धारासाठी जे कार्य केले त्यास इतिहासात तोड नाही. आपल्या अस्पृश्य बांधवांना संघटित करून त्यांना अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्यास व न्याय्य हक्कांसाठी झगडण्यास त्यांनी तयार केले. अशा प्रकारे त्यांनी दलितांमधील अस्मिता जागृत केली. त्याचबरोबर दलितांना मुख्य राष्ट्रीय प्रवाहाशी जोडून आणि भारताची राज्यघटना तयार करून त्यांनी या देशाचीही फार मोठी सेवा केली.’’
यावेळी नगरसेविका लता राजगुरू, अजित दरेकर, संगीता तिवारी, उस्मान तांबोळी, सुजित यादव, राजेंद्र भुतडा, मेहबबु नदाफ, सतीश पवार, रजनी त्रिभुवन, ॲड. राजश्री अडसूळ, उषा राजगुरू, छाया जाधव, रजिया बल्लारी, शारदा वीर, नलिनी दोरगे, ज्योती परदेशी, शिलार रतनगिरी, विक्की खन्ना, राजू पाटोळे, रमेश सोनकांबळे, विशाल जाधव, संतोष पाटोळे, देविदास लोणकर, प्रकाश पवार, समिर शेख, घनश्याम निम्हण, रवि आरडे, रेखा घेलोत, संजय मोरे, फैय्याज शेख, सचिन भोसले, आशुतोष शिंदे, मरूती माने, राज घेलोत, फिरोज शेख, मुन्ना खंडेवाल, नारायण पाटोळे, दिलीप लोळगे आदींसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading