Thursday, June 18, 2026
ENTERTAINMENTLatest News

क्राफ्टन इंडियाने बीजीएमआयसाठी आणला धमाकेदार अपडेट, रणवीर सिंगचा ‘प्लेयेबल कॅरेक्टर’ म्हणून समावेश

क्राफ्टन इंडियाने, बॅट्लग्राउंड्स मोबाइल इंडियासाठी (बीजीएमआय), एका अनोख्या सहयोगाद्वारे, आपल्या बहुप्रतिक्षित अपडेटची घोषणा केली आहे. ह्यामध्ये प्रख्यात बॉलिवूड सुपरस्टार रणवीर सिंगचा समावेश आहे. बीजीएमआयच्या २.९ अपडेटमध्ये बीजीएमआयचा ब्रॅण्ड अँबॅसडर रणवीर सिंग एक ‘प्लेयेबल कॅरेक्टर’ म्हणून सर्वांपुढे येत आहे. बीजीएमआय प्लेयर्सना गेम खेळताना रणवीर सिंगच्या जादूई वलयात आकंठ बुडून जाण्याचा अनुभव ह्यामुळे मिळणार आहे.
भारतीय गेमिंग समुदायासाठी स्थानिक कॉण्टेण्ट तयार करण्यासाठी क्राफ्टन इंडिया करत असलेल्या प्रयत्नांची पुढील पायरी म्हणून, बीजीएमआयने, रणवीर सिंगच्या व्यक्तिमत्वापासून प्रेरित अशी रोमांचक वैशिष्ट्ये प्लेयर्ससाठी आणली आहेत. ह्या अपडेटमधून रणवीर सिंग डिस्कव्हरी इव्हेण्ट, आरएस क्रेट आणि प्ले अँड विन इव्हेण्ट ह्यांचा परिचयही करून दिला जात आहे. ह्यातून रणवीर सिंगच्या व्यक्तिमत्वाचे सार टिपणारी बक्षिसे प्लेयर्स जिंकू शकतील. ह्यामध्ये आरएस डार्क स्टेल्थ आणि आरएस स्वॅगी बाबा ह्या रणवीर सिंगच्या दोन थ्रीडी ‘प्लेयेबल अवतारां’चा समावेश आहे. रणवीर सिंगच्या व्यक्तिमत्वातील अनोखी जादू ह्या अवतारांच्या माध्यमातून आभासी युद्धभूमीवर आणली जाणार आहे. ह्या विस्तृत सहयोगाद्वारे रणवीर सिंगच्या लोकप्रिय नृत्यांतील हालचालींपासून प्रेरित इमोट्स, त्याचा व्हॉइस पॅक आणि अन्य काही आकर्षक अपडेट्सही आणले जाणार आहेत.
रणवीर सिंगसोबतच्या सहयोगातील काही ठळक बाबी खाली दिल्या आहेत:
रणवीर सिंग स्पेशल क्रेट
रणवीर सिंगच्या दोन थ्रीडी अवतारांखेरीज आरएस क्रेटमध्ये त्याच्या लोकप्रिय डान्स मुव्ह्सपासून प्रेरित इमोट्स आहेत. स्वॅगस्टर ग्रूव्ह इमोट, स्वॅगस्टर ताथड इमोट, स्वॅगस्टर स्वे इमोट, स्वॅगस्टर ट्वर्ल इमोट आणि विशेष व्हॉइस पॅक ह्यांचा ह्यात समावेश आहे.
आरएस क्रेटमध्ये आरएस स्वॅगी बगी, आरएस फ्युरी-एम२४९ अपग्रेडेबल गन स्किन, आरएस धमाका (ग्रेनेड स्किन), आरएस पॅन-चो (पॅन स्किन) ह्यांसह दागिने, स्पेस गिफ्ट्स ह्यांसारख्या बक्षिसांचाही समावेश आहे.
यूसी हे खेळातील चलन वापरून आरएस क्रेट खुली करता येईल आणि त्यातून बक्षिसे मिळवता येतील. एका ड्रॉची किंमत ६० यूसी आहे पण दिवसातील पहिला ड्रॉ ३० यूसींना उपलब्ध आहे.
रणवीर सिंग डिस्कव्हरी इव्हेण्ट
आरएस डिस्कव्हरी इव्हेण्टमध्ये पॉइंटवर आधारित पद्धत आहे. ह्यामध्ये प्लेयर्स क्लासिक मोड सामन्यांमध्ये भाग घेऊन पॉइंट्स कमावू शकतात. ह्या इव्हेण्टचे ५० टप्पे आहेत (प्लेयर १०० पॉइंट्स जमवून पुढील टप्प्यात प्रवेश करू शकतो आणि अशा प्रकारे ५०व्या टप्प्यापर्यंत ५००० पॉइंट्स जमवू शकतो). ह्यामध्ये दागिने, स्पेस गिफ्ट्स, पॅराशूट आणि अशी अनेकविध बक्षिसे आहेत.
आरएस डिस्कव्हरी इव्हेण्ट १ डिसेंबर ते २५ जानेवारी ह्या काळात सुरू राहणार आहे. त्यामुळे प्लेयर्सना ह्यात सहभागी होण्यासाठी व बक्षिसे मिळवण्यासाठी मोठा कालावधी आहे.
प्ले अँड विन इव्हेण्ट
ह्यात प्लेयर्स विविध अवघड कामे करून आरएस टोकन्स जमवू शकतात. गेममधील ‘प्ले प्युअर विथ रणवीर सिंग’ ह्या एक्स्चेंज सेंटरमध्ये ह्या टोकन्सच्या बदल्यात त्यांना कायमस्वरूपी बक्षिसे मिळू शकतात. ह्या इव्हेण्टमध्ये प्लेयिंग विथ रणवीर सिंग, प्युअर शोडाउन, टीमिंग अप, प्युअर स्पीड आदी आव्हाने तसेच दैनंदिन लॉगइन्सचा समावेश आहे.
बक्षीस विनिमय पर्यायांमध्ये लायन चॅम्पियन सेट, लायन चॅम्पियन हेडगीअर, थॉर्न्ड रोझ-क्रोबार, निऑन किस ऑर्नमेंट, क्लासिक क्रेट कुपन (५ वेळांची मर्यादा) आणि सप्लाय क्रेट कुपन (१० वेळांची मर्यादा) ह्यांचा समावेश आहे.
क्राफ्टन इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीअॅन ह्युनिल सोन ह्या अपडेटबद्दल म्हणाले, “बॉलिवूडमध्ये सनसनाटी निर्माण करणारा अभिनेता रणवीर सिंग ह्याचे बीजीएमआय रणभूमीवर स्वागत करताना आणि प्लेयर्सना आजवर कधीही मिळाला नव्हता असा गेममध्ये आकंठ बुडून जाण्याचा अनुभव देताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. ह्या विस्तृत सहयोगाद्वारे रणवीर सिंगचे चैतन्य गेममध्ये आणण्यातून, भारतीय गेमर्ससाठी स्थानिक कॉण्टेण्ट देण्याप्रती तसेच आमच्या वैविध्यपूर्ण प्लेयर समुदायांसाठी सांस्कृतिकदृष्ट्या जवळचे वाटणारे अनुभव देण्याप्रती, आमची बांधिलकी दिसून येते. रणवीर सिंग बीजीएमआयमध्ये जो रोमांच व ऊर्जा आणणार आहे, त्याचे साक्षीदार होण्यास आम्ही उत्सुक आहोत. ह्यातून आमच्या प्लेयर्सचा प्रवास अविस्मरणीय होईल अशी ग्वाही आम्ही देतो.”
२.९ अपडेटची महत्त्वाची वैशिष्ट्ये खाली दिली आहेत:
स्नोई व्हिलेज, फ्रॉस्ट फेस्टिवल आणि फेस्टिव मॅप डेकोरेशन्स
२.९ अपडेट व्हर्जनमध्ये बीजीएमआयने स्नोई व्हिलेज (हिमाच्छादित गाव), वेगवान स्नो रेल्स आणि मांड टाकण्याजोगे रेनडीअर्स आणले आहेत. युक्त्याप्रयुक्त्यांसाठी स्नोबॉल ब्लास्टर्सचा समावेश करण्यात आला आहे, शत्रूंचे रूपांतर स्नोमेनमध्ये होत आहे, तर दुमजली आइस स्कल्प्चर प्लाझा अनोखी रणभूमी झाला आहे. १ डिसेंबर, २०२३ ते २४ जानेवारी २०२४ ह्या काळात स्नोई व्हिलेजमध्ये बीजीएमआयचा फ्रोस्ट फेस्टिवल होणार आहे. ह्यामध्ये मनोरंजनाची मेजवानी आहे, स्नोबोर्ड्स आहेत, पाणी गोठवून टाकणारे स्नोबॉल ब्लास्टर्स आहेत. प्लेयर्सना लकी स्नोमॅन आणि स्नो टॉड्लर्स शोधून क्रेट्समधील बक्षिसे जिंकण्याची संधी आहे. उत्सवी रेनडीअर गाड्या सफरीसाठी उपलब्ध आहेत आणि संपूर्ण परिसरात ऋतूला शोभेल अशी सजावट करण्यात आली आहे. एकूण बीजीएमआयच्या २.९ व्हर्जनमध्ये प्लेयर्सना मोहून टाकणारा हिवाळी अनुभव निर्माण करण्यात आला आहे.
रोयाल पास एस
२.९ अपडेट व्हर्जनमधून पुढील रोयाल पास एस आणला गेला आहे. तो १५ जानेवारी २०२४ ते २५ फेब्रुवारी २०२४ ह्या काळात उपलब्ध होईल. आपली प्लेयर रँक सुधारण्यासाठी आणि आकर्षक बक्षिसे खुली करण्यासाठी आरपी मिशन्समध्ये सहभागी व्हा. ह्या बक्षिसांमध्ये नवीन कस्टम कलर पोशाख, स्नोबाइक आणि रेनडीअर फिनिशेससह अन्य आकर्षक वस्तूंचा समावेश आहे.
पगानी ह्या प्रख्यात स्पोर्ट्स कार उत्पादकांसोबत सहयोग
ह्या सहयोगाद्वारे, अद्वितीय रंगसंगतीची दोन पगानी कार मॉडेल्स गेममध्ये आणली जात आहेत. प्लेयर्सना ह्या कार्सची लग्झरी आणि वेग ह्यांचा अनुभव घेण्याची संधी आहे.
हा अपडेट आता लाइव्ह झाला असून, प्लेयर्स खुद्द रणवीर सिंगच्या साथीने आभासी विश्वात प्रवास करण्याचा तसेच खास हिवाळी सुटीसाठी आणलेल्या २.९ अपडेटचा अद्वितीय गेमिंग अनुभव ह्यामध्ये घेऊ शकतात. बीजीएमआयच्या २.९ अपडेटमध्ये नेमके काय आहे ह्याचे संपूर्ण तपशील अधिकृत पॅच नोट्समध्ये आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading