कीर्तन महोत्सवातील जुगलबंदीने रंगले भक्तीचे आख्यान
पुणे: भारतीय विद्या भवन -इन्फोसिस फाऊंडेशन आयोजित ‘कथा कीर्तन महोत्सव’ मध्ये पाचव्या दिवशी, कीर्तनकार श्रेयस बडवे व सौ.मानसी बडवे पती -पत्नीच्या कीर्तन जुगलबंदीने प्रेक्षकांना भारावून टाकले.
पारंपारीक पद्धतीने त्यांनी कीर्तन सादर केले. विचारांचे आदान प्रदान करत जुगलबंदी उत्तरोत्तर रंगत गेली.तसेच भक्त आणि नारायण यांच्यामधील भावबंध उलगडले.श्रेयस बडवे आणि सौ. मानसी बडवे यांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगातून आणि त्याचे निरूपण आणि आख्यान दरम्यान सादर केले.
पुणेकर रसिकांचा या कीर्तनाला चांगला प्रतिसाद मिळाला .
महाराष्ट्रातील शेकडो वर्षांच्या कीर्तन परंपरांचा परिचय आजच्या पिढीला करून देण्याच्या उद्देशाने भारतीय विद्या भवन व इन्फोसिस फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित कथा कीर्तन महोत्सवात हे कीर्तन आयोजित करण्यात आले होते.
भारतीय विद्या भवन बंगळुरू केंद्राच्या सह संचालक नागलक्ष्मी राव, विवेक वेलणकर , नर्मदा परीक्रमाच्या अभ्यासक भारती ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.भारतीय विद्या भवन चे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे यांनी स्वागत केले आणि सूत्रसंचालन केले.
विवेक वेलणकर म्हणाले ” भारतीय विद्या भवन ने किर्तन महोत्सव हा स्तुत्य उपक्रम केला आहे. या उपक्रमाला शुभेच्छा आहेत .नर्मदा परीक्रमाच्या अभ्यासक भारती ठाकूर यांनी ही कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
